आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते,कीटकनाशकांच्या अवशेषांबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सल्लागार सल्लामसलत बैठकीचे उद्‌घाटन

Posted On: 13 FEB 2025 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने 'अन्न पदार्थांमधील कीटकनाशकांच्या अवशेषांवर देखरेख ठेवण्यातील आव्हाने' या विषयावर आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सल्लागार सल्लामसलत बैठकीचे उद्‌घाटन झाले.अन्न पदार्थातील कीटकनाशकांच्या अवशेषांवर अधिक कठोरपणे देखरेख ठेवण्याच्या देशव्यापी धोरणावर भर देत प्रतापराव जाधव यांनी सर्व भागधारकांना अन्न सुरक्षा आणि शाश्वतता याबाबत सर्वोत्तम पद्धती अंगिकारण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

टिकाऊ पॅकेजिंग, न्यूट्रास्युटिकल्स, प्रतिजैविक प्रतिकार इत्यादी नवनवीन मुद्यांवर भागधारकांशी सुरु असलेल्या विचारविनिमय मालिकेतील कीटकनाशकांबद्दलची सल्लामसलत हा पहिलाच भाग होता. भागधारकांशी चर्चा करताना केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि कीटकनाशकांच्या देखरेखीबाबतच्या सध्याच्या पद्धतींचे पुनरावलोकन करण्यावर आणि कीटकनाशकांच्या अवशेषांच्या आव्हानावर मात करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा उभारण्यावर भर दिला. याशिवाय लाखो लोकांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी शेतीच्या महत्त्वावर भर दिला. अलीकडील शेतकरी नवीन तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करत असल्याने कीटकनाशकांचा वापर आणि सर्वोत्तम कृषी पद्धतींबद्दल त्यांना शिक्षण देणे सोपे असल्याचे जाधव यांनी सांगितले.अन्न पदार्थातील कीटकनाशकांचे अवशेष कमी करण्यासाठी सर्व भागधारकांनी एक भरीव कृती आराखडा सादर करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

या सल्लामसलतीमुळे तफावत शोधून काढणे शक्य होईल तसेच अन्न सुरक्षा आणि अन्नपदार्थ कीटकनाशकांच्या अवशेषांपासून मुक्त करण्यासाठी विकसित केल्या जाणाऱ्या प्रभावी यंत्रणा विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगून अन्न सुरक्षा आराखडा मजबूत करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

कीटकनाशकांच्या अवशेषांवरील राष्ट्रीय भागधारक सल्लामसलत ही कीटकनाशकांच्या वापरावर देखरेख ठेवण्यातील आव्हानांना तोंड देऊन आणि नियामक अनुपालन सुनिश्चित करून अन्न सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समन्वित दृष्टिकोनाची गरज ओळखून, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) निगराणी वाढविण्यासाठी, सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि अन्नातील रासायनिक अवशेषांशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यासाठी हे सल्लामसलत सत्र आयोजित केले होते. हे सल्लामसलत सत्र, प्रमुख भागधारकांना एकत्र आणून सर्वोत्तम पद्धती, उदयोन्मुख धोके तसेच जैव-कीटकनाशके आणि त्यांचा अचूक वापर यासारख्या नाविन्यपूर्ण उपायांवर सहकार्य वाढवते. भारताची मानके जागतिक सुरक्षा मानकांशी जुळत असल्याने, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे.

या कार्यक्रमात सरकारी अधिकारी, वैज्ञानिक तज्ञ, नियामक संस्था, राष्ट्रीय संस्था, उद्योग संघटना, शेतकरी संघटना, ग्राहक संघटना आणि कीटकनाशक उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासारखे प्रमुख भागधारक धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि आपल्या मौल्यवान अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आले होते. ही चर्चा ठोस कृती योजना आखण्यास सहाय्यक ठरेल.

या सल्लामसलतीत एक तांत्रिक सत्रही आयोजित करण्यात आले होते. या सत्रानंतर "खाद्य वस्तूंमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचे निरीक्षण करण्यासाठी जागतिक नियामक चौकटी आणि राष्ट्रीय-स्तरावरील आव्हाने" या विषयावर पॅनेल चर्चा झाली.  या पॅनेलमध्ये कीटकनाशक अवशेषांवरील संयुक्त अन्न आणि कृषी संस्था तसेच जागतिक आरोग्य संघटना (FAO/WHO) बैठक (JMPR), अन्न आणि कृषी संस्था (FAO), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB&RC) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (FSSAI) कीटकनाशक अवशेषांवरील वैज्ञानिक मंडळातील तज्ञांचा समावेश होता.

राष्ट्रीय देखरेख कार्यक्रमांचा विस्तार, प्रयोगशाळेची क्षमता वाढवणे, भारताच्या अद्वितीय कृषी आणि पर्यावरणीय परिस्थितीचा विचार करता कोडेक्स एलिमेंटेरियस सारख्या आंतरराष्ट्रीय मानकांशी भारताच्या कमाल अवशेष मर्यादा (MRL) संरेखित करण्यावर चर्चांवर भर देण्यावर ही सल्लामसलत केंद्रित होती.

दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात कृषी, अन्न प्रक्रिया आणि ग्राहक संघटनांमधील भागधारकांनी आपल्या चिंता आणि शिफारसी मांडत खुल्या मंचावरील भागधारकांशी संवाद साधला. सल्लामसलतीदरम्यान उपस्थित केलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये प्रभावी कीटकनाशक अवशेष निरीक्षण अंमलबजावणीतील आव्हाने, भारताच्या कमाल अवशेष मर्यादा (MRL) आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्याची आवश्यकता आणि लेबल नसलेल्या तसेच कीटकनाशकांच्या अति वापराबद्दलच्या चिंता यांचा समावेश होता. आरोग्य धोके आणि व्यापारातील अडथळा कमी करण्यासाठी शेतकरी शिक्षण आणि जागरूकता वाढवण्यावर, डिजिटल ट्रेसेबिलिटी सोल्यूशन्स सादर करण्यावर तसेच जैव-कीटकनाशके आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) सारख्या शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन देण्यावरही भर देण्यात आला.

S.Patil/B.Sontakke/S.Mukhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2102982) Visitor Counter : 50


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi