वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि इस्रायल दहशतवादाविरुद्ध एकत्र,मजबूत संबंधांसाठी कटिबद्ध : भारत इस्रायल व्यापार मंचामध्ये पियुष गोयल यांचे प्रतिपादन


भारत एक स्थिर आणि वाढणारी बाजारपेठ असल्याने भारतात गुंतवणूक करण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांनी इस्रायलला दिले आमंत्रण

Posted On: 11 FEB 2025 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025


दहशतवाद हा भारत आणि इस्रायलचा समान शत्रू असून त्याचा नायनाट करण्याच्या सामायिक उद्देशाने दोन्ही देशांचे पंतप्रधान काम करतात असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघ (CII) द्वारे आयोजित इंडिया इस्रायल व्यापार मंचावर भाषण करताना केले.

गेल्या दशकात, सरकारने देशाच्या व्यापक आर्थिक मूलभूत गोष्टींना बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आर्थिक समृद्धी पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे असे गोयल यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले. आज या प्रयत्नांना भरपूर फायदा झाला आहे. कोविड, युद्ध आणि अशांत भू-राजकीय काळातही देश मजबूत  व्यापक  आर्थिक पायावर उभा आहे, असे ते म्हणाले.

संधींचा फायदा घेण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी, गोयल यांनी 10 डी बद्दल सांगितले – डेमॉक्रसि/लोकशाही, डेमोग्राफीक डिवीडंड/ लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, डिजिटलायझेशन ऑफ इकॉनमी/ अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन, डीकार्बोनायझेशन, डिटर्मिनेशनन/दृढनिश्चय, डिपेंडीबलिटी ऑफ इंडिया/भारताचे  अवलंबित्व, डिसीसीव लीडरशिप/निर्णायक नेतृत्व, डायव्हार्सिटी/ विविधता, डेव्हलपमेंट/ विकास  आणि डिमांड/ मागणी.

भारताकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे असे मंत्र्यांनी नमूद केले आणि सांगितले की तरुण लोकसंख्या पुढील दशकांसाठी एक मजबूत कार्यबल प्रदान करेल. इस्रायलने दिलेली प्रत्येक वचनबद्धता पाळली आहे, त्यामुळे भारत हा इस्रायलचा एक विश्वासार्ह भागीदार आहे यावर मंत्री गोयल यांनी भर दिला.त्यांनी देशाच्या मागणी क्षमतेवरही भर दिला, जी वेगाने वाढत आहे आणि दरवर्षी वाढत आहे. भारत आणि इस्रायल हे नैसर्गिक मित्र आहेत असे सांगून त्यांनी नमूद केले की भारतातर्फे मागणीत मोठ्या  वाढीमुळे इस्रायलकडे तंत्रज्ञानापासून ते उपकरणांपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रमुख क्षेत्र आहेत.


N.Chitale/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2101883) Visitor Counter : 37


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati