संरक्षण मंत्रालय
भारत-इजिप्त संयुक्त विशेष दलांचा सराव सायक्लोन-III राजस्थानमध्ये सुरू
Posted On:
11 FEB 2025 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025
भारत आणि इजिप्तच्या सायक्लोन या संयुक्त विशेष दलाच्या (CYCLONE) तिसऱ्या सरावाची कालपासून राजस्थानमधील महाजन फायरिंग क्षेत्रावर सुरूवात झाली आहे. हा सराव 10 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केला आहे. सायक्लोन सराव हा भारत आणि इजिप्तमध्ये दर वर्षी पाळीपाळीने आयोजित होणारा वार्षिक सराव उपक्रम आहे.या सरावाची मागची आवृत्ती इजिप्तमध्ये जानेवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
25 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व दोन स्पेशल फोर्स बटालियन मधील सैनिक करतील. 25 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या इजिप्तच्या तुकडीचे प्रतिनिधीत्व विशेष दल आणि इजिप्शियन विशेष दलाचा टास्क फोर्स हे मिळून करतील.
संयुक्त कारवाई क्षमता विकास आणि विशेष कारवाईसाठी रणनीतींची परस्पर देवाणघेवाण करून दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांना प्रोत्साहन आणि बळकटी देणे हे सायक्लोन सरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावाच्या वेळी उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीती अभ्यास यावर भर दिला जाईल.
सरावाच्या दरम्यान अभ्यासामध्ये आणि अन्य पैलूंमध्ये विशेष दल प्रगत कौशल्ये आणि सध्याच्या नियमांनुसार इतर विविध डावपेच,तंत्रे आणि प्रक्रियांचा विकास आणि सराव यांचा समावेश असेल.
वाळवंटी/निम-वाळवंटी प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांसाठी सामरिक कवायतींचा अभ्यास आणि 48 तासांच्या सत्यापन सरावाने या उपक्रमाचा समारोप होईल. या सरावादरम्यान स्वदेशी बनावटीच्या लष्करी उपकरणांचे प्रदर्शन आणि इजिप्तच्या संरक्षण उत्पादन उद्योगाचे विहंगावलोकन यांचाही समावेश असेल.
सायक्लोन हा सराव दोन्ही देशांना आपापल्या रणनीतीतील सर्वोत्तम डावपेच आणि कारवाया आयोजित करण्याच्या कार्यपद्धतींद्वारे त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल.या सरावामुळे दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये सौहार्द भावना वाढवण्यास मदत होईल.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2025-02-11at12.58.32PMNF3O.jpeg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2025-02-11at12.58.29PMOR3Y.jpeg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2025-02-11at12.58.33PMY195.jpeg)
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101861)
Visitor Counter : 19