संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल 'नवाचार उत्कृष्टम् भविष्यं' यावर चर्चासत्र आयोजित करणार
Posted On:
09 FEB 2025 3:50PM by PIB Mumbai
भारतीय हवाईदल आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेअंतर्गत सरकारी धोरणांद्वारे स्वदेशी संरक्षण उद्योगांच्या क्षमतांचा लाभ घेण्यासाठी उद्योग भागीदारांसोबत सातत्याने संवाद साधत आहे.
'एअरो इंडिया' हे एक प्रमुख 'एरोस्पेस' आणि संरक्षण प्रदर्शनआहे. हे जागतिक स्तरावर विमानवाहतूक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उत्पादने प्रदर्शित करण्याचे व्यासपीठ आहे. ‘मेक इन इंडिया’ या दृष्टिकोनाला स्वीकारत भारतीय हवाईदल स्वदेशी संरक्षण विकास आणि उत्पादनाला सक्रिय पाठिंबा देत आहे.
याच आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत, आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या शोधार्थ ‘आयएएफ’ ‘नवाचार उत्कृष्टम् भविष्यं’ (नवोन्मेष हा उत्कृष्ट भविष्याचा मार्ग) या संकल्पनेवर एक चर्चासत्र आयोजित करत आहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून हवाईदल प्रमुख देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हे चर्चासत्र 11फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 14:00-16:30 या वेळेत हॉल क्र. 1, येलहंका हवाई तळ, बेंगळुरू येथे होणार आहे.
या चर्चासत्रासाठी सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी, विमान वाहतूक आणि एरोस्पेस क्षेत्रातील उद्योग नेते, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयू), लघू-मध्यम उद्योग (एमएसएमइएस), स्टार्टअप, नवोन्मेषक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या चर्चासत्राचा उद्देश संरक्षण दल, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यातील सहकार्य वाढवून नवोपक्रमांसाठी एक सशक्त परिसंस्था तयार करणे हा आहे.
‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला चालना देण्यासाठी भारतीय हवाई दल ‘वायु वित्त’ हे डिजिटल पोर्टल सुरू करणार आहे. याद्वारे ‘आयएएफ’ आणि ‘एचएएल’ मधील मागणी नोंदवणे, प्रमाणन आणि देयकांची पूर्तता केली जाईल. यामुळे डिजिटायझेशन सोबतच कार्यक्षमतेत आणि पारदर्शकतेत वाढ होईल.
***
S.Kane/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101161)
Visitor Counter : 50