संरक्षण मंत्रालय
एरो इंडिया 2025
अंतराळ वाहन व संरक्षण नवनिर्मितीच्या भविष्याची एक झलक
Posted On:
08 FEB 2025 11:41AM by PIB Mumbai
परिचय
संरक्षण प्रदर्शन संघटना, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित होणारे एरो इंडिया, हे आशियातील एक सर्वात मोठे हवाई व विमान प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी, बंगळुरू येथे आयोजित केले जाते. एरो इंडिया हे भारताचे प्रमुख हवाई वाहतूक व संरक्षण प्रदर्शन आहे, जिथे जागतिक स्तरावरील विमाने व अंतराळ वाहन विक्रेते तसेच भारतीय वायुसेना (IAF) एरोबॅटिक फ्लाइंग प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करतात. या उद्योगातील जागतिक नेते, सरकारी अधिकारी, तंत्रज्ञ व संरक्षण रणनीतीकारांना एकाच छताखाली समायोजित करणारा हा एक प्रमुख उपक्रम आहे. हा कार्यक्रम केवळ देशाच्या तांत्रिक पराक्रमाचे व नवकल्पनांचेच प्रदर्शन करत नाही तर, आंतरराष्ट्रीय सहकार्य व धोरणात्मक संवादासाठी एक गतिमान व्यासपीठ देखील प्रदान करतो.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007AV1B.png)
एरो इंडियाचा वारसा व महत्त्व :
एरो इंडिया हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय उपक्रम म्हणून विकसित झाला आहे; जो केवळ एरोस्पेस तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगतीवर प्रकाश टाकतो, शिवाय देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय भागधारकांमधील धोरणात्मक परस्परसंवादासाठी एक महत्त्वपूर्ण मंच म्हणून काम करतो. हा शो म्हणजे देशाच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षमतांमध्ये प्रगती करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
गेल्या काही वर्षांपासून, एरो इंडियाने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे:
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन: या उपक्रमात नियमितपणे अत्याधुनिक एरोस्पेस सिस्टीम, नाविन्यपूर्ण संरक्षण उपाय तसेच हवाई आणि अंतराळ प्रवासाच्या भविष्याला आकार देणाऱ्या यशस्वी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवली जातात.
- धोरणात्मक संवादांना चालना देणे: उच्च-स्तरीय तज्ज्ञांच्या संवादांद्वारे, एरो इंडियाने धोरण, संरक्षण सहयोग आणि एरोस्पेस क्षेत्राच्या भविष्यातील आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एक क्षेत्र उपलब्ध करून दिले आहे.
- आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढवणे: जागतिक एरोस्पेस विषयांतील दिग्गज व संरक्षण एजन्सींच्या सहभागासह, हा शो आंतरराष्ट्रीय एरोस्पेस समुदायातील एक प्रमुख प्रदर्शन म्हणून भारताचा विकसित होणारा दर्जा अधोरेखित करतो.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image010NZ9C.jpg)
अशा मिळालेल्या या वारशामुळे या प्रदर्शनातील विद्यमान आवृत्त्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे इतकेच नव्हे तर, भविष्यासाठी एक उच्च मापदंड देखील स्थापित केला आहे. एरो इंडिया हे केवळ एक प्रदर्शन नसून ते नावीन्य, धोरण व राष्ट्रीय अभिमान यांचे एकत्रित प्रतिक आहे.
एरो इंडिया 2025
एरो इंडियाची 15 वी आवृत्ती, ही एक ऐतिहासिक आवृत्ती म्हणून डिझाइन करण्यात आली आहे; ज्यात पूर्वीच्या यशाचा लाभ घेत एरोस्पेस व संरक्षण तंत्रज्ञानामधील नवनवीन क्षेत्रांचा आलेख मांडला आहे. एरो इंडिया 2025 हे प्रदर्शन दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान येलाहंका एअर फोर्स स्टेशन, बंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित केले जाईल. पहिले तीन दिवस व्यावसायिक अभ्यागतांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत, तर शेवटचे दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुले आहेत.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image011GC7W.jpg)
‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ ही यंदाच्या वर्षांची व्यापक संकल्पना आहे.
एरो इंडिया 2025 मधील कार्यक्रम
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात नवे उपक्रम, उद्घाटनपर कार्यक्रम, संरक्षण मंत्र्यांच्या बैठका, प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांची परीषद, iDEX स्टार्ट-अप कार्यक्रम, श्वास रोखून धरणारे हवाई शो, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले मोठे प्रदर्शन क्षेत्र आणि एरोस्पेस कंपन्यांचे व्यापार प्रदर्शन यांचा समावेश आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image01399NT.jpg)
मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी संवाद सुलभ करण्यासाठी, भारत ‘ब्रिज(BRIDGE)- आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागातून लवचिकता निर्माण करणे’ या संकल्पनेवर विविध देशांतील संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करेल, यामुळे सुरक्षितता आणि विकासाची सामायिक दृष्टी असलेल्या राष्ट्रांना सहकार्याद्वारे जोडले जाऊ शकते, ज्यायोगे गतिशील भू-राजकीय परिस्थिती आणि परस्पर समृद्धीचा मार्ग मोकळा होतो.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, संरक्षण कर्मचारी प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि सचिव यांच्या स्तरावर अनेक द्विपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नवीन मार्ग शोधून मित्र देशांसोबत संरक्षण आणि अंतराळातील संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेद्वारे (सीईओ राउंड-टेबल) मूळ परदेशी साधनांच्या उत्पादकांना (OEMs) भारतात उत्पादनासाठी अनुकूल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आकांक्षा आहे. प्रमुख जागतिक कार्यकारी अधिकारी, देशांतर्गत सार्वजनिक भागिदारी उपक्रमांचे (PSUs)मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि भारतातील प्रमुख खाजगी संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादक कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, भविष्यातील संभाव्यतांसह इंडिया पॅव्हेलियन आपल्या मेक-इन-इंडिया उपक्रमाप्रती भारताची बांधिलकी जागतिक स्तरावर दाखवत सज्ज झाला आहे. एरो इंडिया 2025 मध्ये भारतीय स्टार्ट-अप्सचा प्रचार यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि त्यांच्याद्वारे विकसित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान/उत्पादनांचा विस्तृत स्पेक्ट्रम एका खास iDEX पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केला जाईल.
याव्यतिरिक्त, डायनॅमिक एरोबॅटिक डिस्प्ले आणि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके आधुनिक एरोस्पेस प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचे प्रदर्शन करून एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव प्रदान करतील. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विविध महत्त्वाच्या विषयांवर अनेक चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image014MQUU.jpg)
एरो इंडिया 2023: मागील आवृत्तीचे विश्लेषण
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image016FGBR.png)
एरो इंडियाच्या मागील आवृत्त्यांनी भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील निरंतर उत्क्रांतीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एरो इंडिया 2023ची 14वी आवृत्ती बंगळुरू, कर्नाटक येथे दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि 1996 साली आरंभ झाल्यापासून यात प्रथमच 100 हून अधिक देश, 809 प्रदर्शकांसह, 53 विमानांसह प्रथमच फ्लाय पास्ट आणि जागतिक अभ्यागतांसह एकूण 7 लाखांहून अधिक अभ्यागतांनी त्याला पाच दिवसांत भेट दिली होती. 1996 मध्ये स्थापन झाल्यापासून जागतिक भेटींसाठी आमचे हवाई सामर्थ्य दाखवणारी ही सर्वात मोठी आवृत्ती आहे.
एरो इंडिया 2023 आवृत्तीमधे प्रभावी प्रात्यक्षिकांच्या मालिकांसह अनेक महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण टप्पे होते. त्यातील प्रमुख पैलू पुढीलप्रमाणे:
प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञानाचे प्रदर्शन: 2023 घ्या उपक्रमाने कंपन्यांना अत्याधुनिक एरोस्पेस प्रणाली आणि संरक्षण उपाय प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले.यातून केवळ तांत्रिक नवकल्पनाच दिसून आली नाही तर या क्षेत्रातील भविष्यातील प्रगतीचा टप्पाही निश्चित झाला.
धोरणात्मक सहभागाची सुविधा: सरकारी अधिकारी, उद्योग तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांसह विविध भागधारकांच्या गटाला एकत्र आणण्यासाठी एरो इंडिया 2023 महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमाने सहयोगी उपक्रम आणि तांत्रिक भागीदारीवर आधारित धोरणात्मक संवादाचे वातावरण निर्माण केले.
जागतिक स्तरावर भारताची स्थिती मजबूत करणे: सर्वसमावेशक आणि सु-समन्वित प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करून, एरो इंडिया 2023 ने भारताची एरोस्पेस क्षमता वाढवण्याच्या कटिबद्धतेला बळकटी दिली. एरोस्पेस क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना पुढे नेण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत सहकार्य करण्याची देशाची तयारीही या शोने अधोरेखित केली.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image017S0O0.png)
एरो इंडिया 2023 मधील यश आणि आव्हाने यांनी जे मौल्यवान धडे दिले आहेत, ते एरो इंडिया 2025 च्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये समाविष्ट केले जात आहेत. 2023 मध्ये ठळकपणे प्रदर्शित होणारे घटक- कार्यवाहीतील उत्कृष्टता, आंतरराष्ट्रीय सहयोग आणि तांत्रिक नवकल्पना यावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांनी आगामी संपादनासाठी आधारशिला म्हणून काम केले आहे. मागील आवृत्तीत तयार झालेल्या सुधारित आचारसंहिता, उत्तम रणनीती आणि विस्तारित जागतिक सहभागाच्या पाऊलखुणांसह, 2025 मध्ये या उपक्रमाला आणखी गती मिळून तो अधिक यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
इंडिया 2023 मधील कार्यक्रम
या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांची बैठक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज; स्टार्ट अप्सवर मंथन; बंधन सोहळा; श्वास रोखणारे एअर शो; एक मोठे प्रदर्शन; इंडिया पॅव्हेलियन आणि एरोस्पेस कंपन्यांचे व्यापारी प्रदर्शन यांचा समावेश होता;
प्रमुख प्रदर्शक आणि उपकरणे
प्रमुख प्रदर्शकांमध्ये एअर बस, बोईंग, दासॉल्ट एव्हिएशन, लॉकहीड, आर्मी एव्हिएशन, एच.सी.रोबोटिक्स, साब(SAAB), सॅफ्रॉन (Safran), रोल्स राईस, लार्सन ॲन्ड टुब्रो, भारत फोर्ज लिमिटेड हिंदुस्थान एरोनॉटिक्स, (Earonautics), (ईएलबी), लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि बीईएमएल BEML लिमिटेड यांचा समावेश होता.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image019Z8EI.jpg)
एरो इंडिया 2023 ने UAVs क्षेत्र, संरक्षण अंतराळ तसेच भविष्यकालीन तंत्रज्ञानामधील डिझाइन नेतृत्व आणि विकास दर्शविला. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA)-तेजस, HTT-40, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (ALH) या सारख्या स्वदेशी बनावटीच्या हवाई उपकरणांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
संरक्षण मंत्र्यांचे संमेलन
संरक्षण मंत्र्यांचे संमेलन 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी देशांचे संरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते, हे संमेलन ‘संयुक्त गुंतवणुकीद्वारे सामायिक समृद्धी (स्पीड)’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात क्षमता वृद्धीकरणासाठी सहकार्य अधिक मजबूत करण्यासंदर्भातील पैलूंवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये गुंतवणूक, संशोधन व विकास(आर अँड डी), संयुक्त उपक्रम, सह-विकसन, सह-उत्पादन आणि संरक्षण उपकरणांचा पुरवठा यांचा समावेश होता. तसेच, प्रशिक्षण, अवकाश, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सागरी सुरक्षा या विषयांवरही चर्चा झाली, जेणेकरून सर्वांना एकत्र प्रगती साधता येईल.
हे संमेलन संरक्षण मंत्र्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करणारे होते, जेणेकरून ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनाला पुढे नेता येईल.
द्विपक्षीय बैठका
एरो इंडिया 2023 च्या अनुषंगाने, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि संरक्षण सचिव यांच्यासह विविध स्तरांवर द्विपक्षीय बैठका आयोजित करण्यात आल्या. मैत्रीपूर्ण देशांसोबत संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करणे आणि भागीदारीला पुढील स्तरावर नेण्यासाठी नवीन मार्ग शोधणे, हा या बैठकींचा मुख्य उद्देश होता.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) गोलमेज परिषद
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) गोलमेज परिषद रक्षा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 13 फेब्रुवारी 2023 रोजी ‘आकाश ही मर्यादा नाही: सीमांच्या पलीकडे संधी’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उद्योग भागीदार आणि सरकार यांच्यात अधिक सशक्त संवादाची पायाभरणी करण्यात आली. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला बळकटी देणे, हा यामागचा उद्देश होता.
गोलमेज परिषदेमध्ये 26 देशांतील अधिकारी, प्रतिनिधी आणि जागतिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. ज्यामध्ये बोइंग, लॉकहीड, ईसराइल एअरोस्पेस इंडस्ट्रीज, जनरल अटोमिक्स, लीभेर ग्रुप, रेथियॉन टेक्नोलॉजीज, सफरान, जनरल अथॉरिटी ऑफ मिलिटरी इंडस्ट्रीज (जीएएमआय) यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश होता. यामध्ये एचएएल, बीईएल, बीडीएल, बीईएमएल लिमिटेड आणि मिश्र धातू निगम लिमिटेड यांसारख्या देशांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचाही (पीएसयु) सहभाग होता.
बंधन समारंभ
बंधन समारंभामध्ये सामंजस्य करार (एमओयु) / करारनामे, तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादन लाँच आणि अन्य मोठ्या घोषणा साक्षीदार ठरल्या. हा समारंभ 15 फेब्रुवारी रोजी पार पडला. बंधन समारंभात B2B भागीदारी घडवून आणण्यावर विशेष भर देण्यात आला आणि अशा 250 हून अधिक भागीदाऱ्या अंतिम करण्यात आल्या, ज्यांची एकूण किंमत 75,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.
मंथन
वार्षिक संरक्षण नवोपक्रम कार्यक्रम मंथन हा 15 फेब्रुवारी रोजी पार पडलेला एक प्रमुख तंत्रज्ञान प्रदर्शन कार्यक्रम होता. इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (आयडीईएक्स) द्वारे आयोजित करण्यात आलेले मंथन हे व्यासपीठ, संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील आघाडीचे नवोपक्रमक, स्टार्टअप्स, एमएसएमइ, इनक्यूबेटर्स, अकादमिक क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांना एकाच छताखाली एकत्र आणेल.
मंथन मध्ये अनेक गोष्टी प्रथमच घडल्या, ज्यामध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रातील आव्हाने, आयडीईएक्स इन्व्हेस्टर हबची स्थापना, गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (एमओयू) इत्यादींवरील चर्चासत्रांचा समावेश होता.
मंथन 2023 ने आयडीईएक्स चा भविष्यातील दृष्टीकोन आणि पुढील उपक्रमांचे संक्षिप्त दर्शन घडवले, जेणेकरून संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना मिळेल आणि नवोपक्रम व तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिले जाईल.
इंडिया पॅव्हेलियन
‘फिक्स्ड विंग प्लॅटफॉर्म’ या संकल्पनेवर आधारित इंडिया पॅव्हिलियनने या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे तसेच भविष्यातील संधींचे प्रदर्शन केले. एकूण 115 कंपन्यांनी 227 उत्पादने प्रदर्शित केली. फिक्स्ड विंग प्लॅटफॉर्मसाठी भारताने विकसित केलेल्या परिसंस्थेच्या वाढीचेही यामध्ये दर्शन घडवण्यात आले, ज्यामध्ये खाजगी भागीदारांकडून निर्मित एलसीए-तेजस विमानाच्या विविध संरचनात्मक विभागांचे, सिम्युलेटरचे आणि प्रणालींचे (एलआरयू) सादरीकरण समाविष्ट होते.
याशिवाय, संरक्षण अंतराळ, नवीन तंत्रज्ञान आणि यूएव्ही विभागासाठी स्वतंत्र विभाग होता, ज्यामधून या प्रत्येक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीची सखोल माहिती मिळाली.
पूर्ण प्रमाणात एलसीए-तेजस विमान पूर्ण संचालन क्षमतेच्या (एफओसी) संरचनेत भारत पॅव्हिलियनच्या मध्यभागी होते. एलसीए तेजस हे एकल इंजिन असलेले, हलके, अत्यंत चपळ, बहुपयोगी आणि सुपरसोनिक लढाऊ विमान आहे. त्यामध्ये चौपट डिजिटल फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल सिस्टम (एफसीएस) आणि संबंधित प्रगत उड्डाण नियंत्रण नियम आहेत. डेल्टा विंग असलेले हे विमान 'हवाई लढाई' आणि 'आक्रमक हवाई समर्थन' यासाठी डिझाइन केलेले आहे, तर 'गुप्तचर माहिती संकलन' आणि 'विरोधी-नौदल कारवाई' यासाठी दुय्यम भूमिका बजावते.
परिसंवाद
पाच दिवसीय कार्यक्रमादरम्यान अनेक परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. भारतीय संरक्षण उद्योगासाठी माजी सैनिकांच्या क्षमतेचा उपयोग, भारताच्या संरक्षण अंतराळाचा पुढाकार: भारतीय खाजगी अंतराळ परिसंस्थेच्या विकासासाठी संधी, एरो इंजिनसह भविष्यातील एअरोस्पेस तंत्रज्ञानाचा स्वदेशी विकास, डेस्टिनेशन कर्नाटका: अमेरिका-भारत संरक्षण सहकार्य नवकल्पना आणि मेक इन इंडिया, सागरी देखरेख उपकरणे आणि संसाधनांमध्ये प्रगती, एमआरओ मध्ये टिकाव व कालबाह्यता निवारणसंरक्षण दर्जाच्या ड्रोन क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करणे आणि एरो आर्मामेंट टिकावामध्ये आत्मनिर्भरता मिळवणे इत्यादी विषयांचा समावेश होता.
एरो इंडिया 2023 मधील महत्त्वाचे करार
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स, फ्रान्स यांच्यात हेलिकॉप्टर इंजिनच्या डिझाइन, विकास, उत्पादन आणि आयुष्यभरासाठीच्या देखभालीसाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी काम वाटपावरील सामंजस्य करार (एमओयू).
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यात अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) साठी (आयडब्लूबीसी) आणि अन्य एलआरयू संदर्भात सामंजस्य करार (एमओयू).
- बीएसएस मटेरियल लिमिटेड आणि पेगासस इंजिनिअरिंग (एडीयुईएसए कंपनी, अमेरिका) यांच्यात भारतीय लष्करासाठी लॉजिस्टिक ड्रोनसंदर्भात सहकार्य करार करण्यात आला. हा करार सीमावर्ती भागात तैनात केलेल्या सैन्यासाठी लास्ट-माईल डिलिव्हरी सक्षम करण्यासाठी आहे, ज्यामध्ये सोसाट्याचा वारा/वादळ, पाऊस, बर्फवृष्टी यांसारख्या हवामान असलेल्या परिस्थितीत कार्य करण्याची क्षमता असेल.
- गोपालन एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम्निपोल, झेक रिपब्लिक यांच्यात भारतातील खाजगी कंपनीद्वारे पहिले प्रवासी विमान (एल 410 यूव्हीपी-E20 व्हर्जन) तयार करण्यासाठी आणि बांधणी करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले.
- सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड (एसडीइपीएल) आणि इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) यांच्यात भारतीय नौदलासाठी आयडीइएक्स चॅलेंज “स्वायत्त शस्त्रास्त्रयुक्त बोटींचा थवा” विकसित करण्यासाठी सहकार्याचा सामंजस्य करार (एमओयू).
- भारत डायनामिक्स लिमिटेड आणि बुलटेक्सप्रो लिमिटेड, बल्गेरिया यांच्यात 122mm GRAD BM ER आणि NONER रॉकेट्सच्या उत्पादन सुविधा भारतात स्थापन करण्यासाठी आणि गरजांनुसार (ToT सहित) पूर्तता करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू).
- GRSE आणि Rolls-Royce Solutions GmbH (एमटीयू) यांच्यात भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन फास्ट अटॅक क्राफ्ट वेसलसाठी स्वदेशी घटक वाढवण्यासाठी एमटीयू 16V4000M73L इंजिनचे परवाना उत्पादन आणि स्थानिकीकरण यासाठी सामंजस्य करार (एमओयू).
- बीइएमएल ने टी-72/टी-90 टँकसाठी टीआरएडब्लूएल असेंब्लीच्या विकास आणि पुरवठ्यासाठी R&DEE, DRDO सोबत तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) करण्यासाठी परवाना करार केला.
- DLRL DRDO कडून BEL हैदराबाद युनिटला Shakti EW प्रणालीच्या सर्व युनिट्स, साहित्य यादी (Bill of Material), चाचणी प्रक्रिये, एकत्रीकरण आणि पुरवठा पद्धतीसाठी तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT).
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि एल्टा सिस्टिम्स लिमिटेड, इस्राएल यांच्यात भारतीय प्लॅटफॉर्मसाठी मॅरीटाइम पेट्रोल रडार (MPR) च्या भविष्यातील व्यवसायासाठी सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू).
एरो इंडिया 2023 मध्ये प्रदर्शित उत्पादने
वर्टिकली लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस-टू-एअर मिसाइल (भारत डायनॅमिक्स लिमिटेड): व्हीएलएसआरएसएएम ही पुढील पिढीतील, जहाज-आधारित, सर्व हवामानात कार्यक्षम हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही मिसाइल नौदलासाठी जलद प्रतिसाद देणारी पॉइंट डिफेन्स प्रणाली म्हणून वापरली जाऊ शकते, विशेषतः सुपरसोनिक समुद्राच्या पृष्ठभागाजवळून जाणाऱ्या लक्ष्यांवर, जसे की लढाऊ विमान आणि यूएव्ही. या मिसाइलमध्ये स्मोकलेस प्रणोदन प्रणाली आणि सर्व हवामानात कार्य करण्याची क्षमता आहे. ती अत्यंत चपळ संरचनेसह विकसित करण्यात आली असून, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटर मेजर्स (इसीसीएम) वैशिष्ट्ये आहे.
एरो इंडिया 2023 मध्ये प्रदर्शित उत्पादने
SAL Seeker एटीजीएम for बीएमपी II (भारत डायनॅमिक्स लिमिटेड): सेमी-ॲक्टिव्ह लेझर सीकर आधारित अँटी-टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) हे बीएमपी-II साठी विकसित करण्यात आलेले उपसोनिक क्षेपणास्त्र आहे. याची श्रेणी 4,000 मीटर आहे आणि उड्डाण कालावधी 25 सेकंद आहे. हे क्षेपणास्त्र लाँच ट्यूबसह 23 किलो वजनाचे आहे आणि विविध भूप्रदेशांमध्ये वापरता येते. तसेच, हलणारी आणि स्थिर लक्ष्ये, जसे की रणगाडे आणि इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांना निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.
जिष्णू (भारत डायनेमिक्स लिमिटेड): जिष्णू हे ड्रोनद्वारे नेले जाणारे हलके आणि लघुकरण केलेले क्षेपणास्त्र आहे, जे सॉफ्ट-स्किन लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी विकसित केले आहे. याची श्रेणी 1.5 किमी आहे आणि उड्डाण कालावधी 9 सेकंद आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली अर्ध-स्वयंचलित किंवा संपूर्णपणे स्वायत्त असू शकते, प्रणालीच्या संरचनेनुसार त्याचे कार्य ठरते. स्वदेशी विकसित प्रोसेसरवर आधारित सॉफ्टवेअर-डिफाइंड एनएव्हीआयसी/जीपीएस रिसीव्हर मॉड्यूल (अस्त्र मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट लिमिटेड).
DRDO तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी-निर्मित ‘काउंटर ड्रोन रडार’ (अस्त्र मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट लिमिटेड).
9mm उपसोनिक दारुगोळा (म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड).
BFT on iOS (ideaForge Technology Limited): BlueFire Touch हे आमचे ग्राउंड कंट्रोल स्टेशन (जीसीएस) सॉफ्टवेअर असून, हे मॅपिंग आणि देखरेख मोहीम नियोजित करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर ऑपरेशनल क्षेत्र आणि लक्ष्य स्थाने लक्षात घेऊन वेपॉइंट-आधारित नेव्हिगेशनद्वारे मोहिमा पूर्वनियोजित करण्याची क्षमता प्रदान करते.
HF SDR Radio (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड): हे एक प्रगत सॉफ्टवेअर-डिफाइंड रेडिओ आहे. हे 20 W ट्रान्समिट क्षमता असलेले हलके रेडिओ आहे. हे एचएफ बँडमध्ये गर्दीच्या वातावरणात अल्प-श्रेणी संप्रेषण तसेच दृष्टीक्षेपाच्या पलीकडील दूर-संप्रेषण आवश्यकतांसाठी संपूर्ण समाधान प्रदान करते.
गोनिओमीटर (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड): हे कोणत्याही एकात्मिक निरीक्षण आणि फायर कंट्रोल मॉनिटरींग प्रणालीचा एक भाग आहे. हे तोफखान्याद्वारे दिवसा आणि रात्रीच्या वेळी वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
भविष्याचा वेध: भारतातील एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राचा पुढील प्रवास
एरो इंडिया: केवळ प्रदर्शन नव्हे, तर भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल
एरो इंडिया हे केवळ एक प्रदर्शन नाही, तर भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेता बनण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा उपक्रम खालील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोलाची भूमिका बजावतो:
तंत्रज्ञान प्रगतीला चालना देणे: नवोन्मेषक आणि उद्योगातील आघाडीचे नेते एकत्र आणून, एरो इंडिया नेक्स्ट-जनरेशन एरोस्पेस सिस्टीमच्या विकास आणि उपयोजनासाठी उत्प्रेरकाचे कार्य करते.
राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीसाठी योगदान:
या कार्यक्रमात सादर केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान आणि रणनीती भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्यात थेट योगदान देतात. ज्यामुळे देश आधुनिक आणि भविष्यातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम राहतो. आर्थिक वाढ मजबूत करणे, संरक्षण क्षेत्राच्या पलीकडे पाहणे, एरोस्पेसमधील प्रगती, आर्थिक वाढ, औद्योगिक विकास आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेवर दूरगामी परिणाम घडवून आणले जातात.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image02367DI.jpg)
निष्कर्ष: एरो इंडिया सोबत भविष्याचा स्वीकार
एरो इंडिया हे भारताच्या नवोन्मेष, धोरणात्मक सहकार्य आणि एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारत एरो इंडिया 2025 चे आयोजन करण्यास सज्ज होत असताना, हा कार्यक्रम मागील आवृत्तींच्या,विशेषतः परिवर्तनशील एरो इंडिया 2023 च्या यशावर आधारित समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचे आश्वासन देतो.
कठोर कार्यपद्धती, धोरणात्मक भागीदारी आणि दूरदृष्टीपूर्ण प्राधान्यक्रम यांच्याद्वारे एरो इंडिया 2025 भारताच्या जागतिक अंतराळ क्षेत्रातील स्थानाला अधिक उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे.
---
परिशिष्ट
एरो इंडिया कार्यक्रमाचा विस्तृत आराखडा: https://www.aeroindia.gov.in/assets/front/broad_programme.pdf
परिषदा आणि चर्चासत्रांची यादी: https://www.aeroindia.gov.in/assets/front/seminar_list.pdf
आमंत्रित वक्त्यांची यादी: https://www.aeroindia.gov.in/assets/front/speakers_list.pdf
प्रेक्षक नोंदणी: https://www.aeroindia.gov.in/visitor-registration
संदर्भ
https://www.aeroindia.gov.in/
https://www.aeroindia.gov.in/faq
https://www.aeroindia.gov.in/whyexhibit
https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1899388
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2091447
https://www.ddpmod.gov.in/resources/photos/aero-india
https://x.com/aeroindiashow?lang=en
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1898547
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2090516
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1989502
https://x.com/MIB_India/status/1887124348617760992
https://x.com/AeroIndiashow/status/1887371647331516549
https://x.com/MIB_India/status/1886725544823415252
https://x.com/AeroIndiashow/status/1887050312281641266
https://x.com/AeroIndiashow/status/1869024504485208160/photo/1
https://x.com/AeroIndiashow/status/1849117379852132485/photo/1
https://x.com/AeroIndiashow/status/1626582275365441537/photo/3
https://x.com/AeroIndiashow/status/1626530283892903936/photo/1
https://www.ddpmod.gov.in/resources/photos/aero-india
Click here to download PDF
***
S.Pophale/S.Patgoankar/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101036)
Visitor Counter : 55