माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ 2025 : प्रयागराज मेळ्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रदर्शनाची  आकाशवाणीच्या महासंचालकांनी केली पाहणी   आणि मीडिया सेंटरमध्ये पत्रकारांशी साधला संवाद

Posted On: 07 FEB 2025 8:17PM by PIB Mumbai

 

आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी आज प्रयागराज येथील महाकुंभात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'जनभागीदारी से जनकल्याण' या मल्टीमीडिया प्रदर्शनाची पाहणी केली.. या प्रदर्शनात भारत सरकारचे गेल्या 10 वर्षांतील विविध कार्यक्रम, धोरणे, योजना आणि कामगिरी प्रदर्शित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी   योजनांचे प्रदर्शन करणारे डिजिटल फोटो प्रदर्शन खूपच मनोरंजक आणि माहितीपूर्ण असल्याचे महासंचालकांनी सांगितले. याशिवाय, या प्रदर्शनात महाकुंभाचे  पौराणिक महत्त्व अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या भाविकांना पौराणिक कथा आणि आधुनिकतेचे आकर्षक मिश्रण येथे अनुभवायला मिळाले. डॉ. गौर यांनी आपल्या प्रदर्शन भेटीत प्रधानमंत्री अंतर्वासिता योजना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रकाशन विभाग आणि एनडीआरएफशी संबंधित स्टॉल्सचाही आढावा घेतला.

तत्पूर्वी, महासंचालकांनी सेक्टर 4 येथे उभारण्यात आलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या अस्थायी केंद्रालाही भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रांचा आणि कार्यक्रमांचा आढावा घेतला. या कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांना महाकुंभातील घडामोडींबद्दल प्रत्येक मिनिटाची माहिती मिळत असल्याचे  त्यांनी सांगितले.

डॉ. गौर यांनी मेळा परिसरातील मीडिया सेंटरलाही भेट दिली आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2100928) Visitor Counter : 35