महिला आणि बालविकास मंत्रालय
कार्यक्षम देखरेख आणि सेवा वितरणासाठी अंगणवाडी सेविकांना मिशन पोषणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत (2.0) स्मार्टफोन्स देऊन तांत्रिकदृष्ट्या केले सक्षम
Posted On:
07 FEB 2025 4:12PM by PIB Mumbai
बालके, किशोरवयीन, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचे सर्वांगीण पोषण होण्यासाठी दिनांक 8 मार्च 2018 रोजी पोषण अभियान, ही एक व्यापक योजना सुरू करण्यात आली.पोषण अभियानांतर्गत, अंगणवाडी सेविकांमधे क्षमता निर्माण करण्यासाठी त्यांना विकासशील प्रशिक्षण देत त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यात येत आहे .
मिशन पोषण 2.0 अंतर्गत, अंगणवाडी सेविकांना (AWWs) कार्यक्षम देखरेख आणि सेवा वितरणासाठी स्मार्टफोनच्या तरतुदीसह तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्रांवरील पोषण वितरण सहाय्य प्रणालींना बळकट करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणि मुलांमध्ये (0-6 वर्षे) वाढ खुंटणे (स्टंटिंग),स्नायूंची कमजोरी , कमी वजनाची मुले यांचे प्रमाण ओळखण्यासाठी माहीती तंत्रज्ञान (IT) प्रणालींचा लाभ घेतला जात आहे. तसेच यामुळे याने अंगणवाडी सेवांसाठी डेटा संकलन उदाहरणार्थ, दैनंदिन उपस्थिती, बालपणातील काळजी आणि शिक्षण ,शिजवलेले गरम अन्न/घरी न्यायचा शिधा, वाढीचे मोजमाप अशा सर्वच बाबतीत माहितीचे संकलन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हा अनुप्रयोग अंगणवाडी सेविकांना सहायक ठरत असून देखभाल करण्यासाठी प्रत्यक्ष नोंदवह्या ठेवणे, अशाप्रकारच्या कामांचा भार कमी झाला आहे.
क्षमता वाढीसाठी पोषण आणि बालकांची काळजी आणि प्रशिक्षण हे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पोषण ट्रॅकरवर ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत.
त्याचप्रमाणे, सहा वर्षांखालील मुलांची बालपणातील काळजी घेणे आणि पोषण सेवा प्रदान करण्याची क्षमता निर्माण करणे यासाठी, सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी दिनांक 10 मे 2023 रोजी पोषण भी पढाई भी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आजपर्यंत, 31,114 एसएलएमटी (सीडीपीओ, पर्यवेक्षक आणि अतिरिक्त संसाधन व्यक्ती) आणि 145,481 अंगणवाडी सेविका यांना या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना विकासाचे मोजमाप, गृहभेटी आणि अंगणवाडी केंद्रे उघडण्यासाठी अनुक्रमे रु. 500/- प्रति महिना आणि रु. 250/- दरमहा अशा कामगिरीशी निगडीत प्रोत्साहन भत्त्याची तरतूद यात आहे.
ही माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. सावित्री ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2100793)
Visitor Counter : 30