दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायने राष्ट्रीय क्रमांकन योजनेमधील सुधारणेबाबत शिफारशी केल्या जारी
Posted On:
06 FEB 2025 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज ‘राष्ट्रीय क्रमांकन योजनेमधील सुधारणेबाबत' शिफारशी जारी केल्या आहेत.
टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर्स (TIs)/ नंबरिंग संसाधनांचा वापर दूरसंचार वापरकर्ता, सेवा, नेटवर्क घटक, उपकरणे किंवा अधिकृत संस्था यांची विशिष्ट प्रकारे ओळख पटवण्यासाठी वापरली जातात. आजच्या परस्परांशी जोडलेल्या डिजिटल विश्वात, जिथे कोट्यवधी उपकरणे आणि वापरकरते आहेत, तिथे ग्राहक, व्यवसाय आणि उद्योगांना दूरसंचार सेवांची सार्वत्रिक सुलभता आणि विश्वासार्ह सेवा सुनिश्चित करण्यासाठी नंबरिंग संसाधनांची पुरेशी उपलब्धता आणि कार्यक्षम वापर गरजेचा आहे.
ट्रायला दूरसंचार विभागाकडून दिनांक 29.9.2022 रोजी एक संदर्भ पत्र क्रमांक 16-16/2022-AS-III/123/233 प्राप्त झाले होते, ज्यात वेगाने होत असलेला विकास आणि सुधारित राष्ट्रीय क्रमांकन योजनेमुळे उद्भवलेल्या फिक्स्ड लाइन क्रमांकन संसाधनांच्या पुरेशा उपलब्धतेशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शिफारसी मागविण्यात आल्या होत्या. दूरसंचार विभागाने फिक्स्ड-लाइन नंबरिंग योजना , लेव्हल ‘1’ शॉर्ट कोड नंबरिंग रिसोर्सेस, सर्व्हिस कंट्रोल पॉइंट कोड, सिग्नलिंगसाठी नॅशनल सिग्नलिंग पॉइंट कोड, कॅप्टिव्ह नॉन-पब्लिक नेटवर्क रिसोर्सेससाठी मोबाईल कंट्री कोड-मोबाईल नेटवर्क कोड (MCC-MNC), M2M नंबरिंग रिसोर्सेस, इंटेलिजन्ट नेटवर्क सर्विसेस आणि नंबर पोर्टेबिलिटी कोड (लोकेशन राउटिंग क्रमांक) यासंबंधीच्या बाबींची तपासणी आणि शिफारशींची विनंती केली होती.
त्यानुसार,ट्राय ने 6 जून 2024 रोजी 'राष्ट्रीय क्रमांकन योजनेत सुधारणा ' या विषयावर एक सल्लामसलत पत्र जारी केले. विविध हितधारकांकडून मिळालेल्या सूचना आणि हरकती ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संदर्भात, 8 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ओपन हाऊस चर्चा आयोजित करण्यात आली होती.
सल्लामसलत प्रक्रियेदरम्यान संबंधितांकडून मिळालेल्या सूचना /माहिती, ओपन हाऊस चर्चा दरम्यान झालेल्या चर्चा आणि समस्यांचे सखोल विश्लेषण याच्या आधारे प्राधिकरणाने 'राष्ट्रीय क्रमांकन योजनेतील सुधारणांबाबत' शिफारसींना अंतिम रूप दिले आहे.
शिफारशींची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:-
A. क्रमांकन संसाधनांवर शुल्क:
- या टप्प्यावर क्रमांकन संसाधनांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा आर्थिक दंड आकारण्याची शिफारस केलेली नाही.
- दूरसंचार सेवा पुरवठादारांना वाटप केलेल्या क्रमांकन संसाधनांच्या वार्षिक वापरावर दूरसंचार विभाग लक्ष ठेवेल आणि आवश्यकता भासल्यास, वापर न केलेली क्रमांकन संसाधने काढून घेऊ शकतात.
B. फिक्स्ड-लाइन सेवांमध्ये क्रमांकन संसाधन मर्यादांचे निराकरण करण्यासाठी
- फिक्स्ड-लाइन सेवांसाठी शॉर्ट डिस्टन्स चार्जिंग एरिया (SDCA) (बहुतांश तालुका/तहसील) मधून लायसन्स सर्व्हिस एरिया (LSA) आधारित 10-अंकी क्लोज्ड नंबरिंग योजनेमध्ये सहभागी व्हा जेणेकरून सध्या SDCA स्तरापुरती मर्यादित नंबरिंग संसाधने वापरता येतील.
- सर्व फिक्स्ड-लाइन ते फिक्स्ड-लाइन कॉल डायल करताना सुरुवातीला '0' वापरून त्यानंतर एसटीडी कोड आणि सबस्क्राइबर नंबर टाका.
- फिक्स्ड-टू-मोबाईल, मोबाईल-टू-फिक्स्ड आणि मोबाईल-टू-मोबाईल कॉल्ससाठी डायलिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल नाही.
- उपभोक्त्याचे विद्यमान नंबर बदलणार नाहीत.
- नवीन क्रमांक योजना लागू करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी.
- एलएसए-आधारित 10-अंकी क्लोज्ड नंबरींग बंद योजनेच्या अंमलबजावणीनंतर, फिक्स्ड-लाइन लोकेशन राउटिंग नंबर (FLRN) कोड वापरून 10-अंकी फिक्स्ड-लाइन नंबरिंग स्कीम जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कालावधीत स्वीकारली जावी, जेणेकरून देशभरात एलएसए-आधारित नंबरींग संसाधने उपलब्ध होतील. यामुळे नजीकच्या भविष्यात फिक्स्ड-लाइन नंबर पोर्टेबिलिटी (जसे सध्या मोबाईल नेटवर्कमध्ये उपलब्ध आहे) लागू करणे सुलभ होईल.
C. यूसीसी (अनसोलिसेटेड कमर्शियल कम्युनिकेशन), स्पॅम कॉल आणि सीएलआय स्पूफिंग प्रतिबंधित करणे:
- दूरसंचार विभाग 23.02.2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘भारतीय दूरसंचार नेटवर्कमध्ये कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवा सुरू करण्याबाबत’ ट्रायच्या शिफारसी लवकरात लवकर अंमलात आणेल. यात मोबाईल नेटवर्क वरील कॉल बंद करण्यासाठी सर्व एसायपी (सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल) आणि पीआरआय (प्रायमरी रेट इंटरफेस) CNAP पूरक सेवांची त्वरीत अंमलबजावणी समाविष्ट आहे.
- सीएलआय (कॉल लाइन आयडेंटिफिकेशन) स्पूफिंग आणि टॅंपरींग थांबवण्यासाठी, सीएलआय प्रमाणीकरण फ्रेमवर्क आणि वितरित प्रमाणन प्राधिकरण फ्रेमवर्क अनुक्रमे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या (ITU) शिफारसी Q.3057 आणि Q.3062 नुसार लागू केले जावे.
D. मोबाईल आणि फिक्स्ड लाइन कनेक्शनसाठी नंबरींग संसाधने निष्क्रिय करण्यासाठी निर्देशीत कालावधी:
- दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSPs) कोणतेही मोबाईल किंवा फिक्स्ड-लाइन कनेक्शन सलग 90 दिवस वापर बंद ठेवल्याचा कालावधी संपेपर्यंत निष्क्रिय केले जाणार नाहीत.
- वापर न केल्यामुळे निष्क्रिय राहिलेली सर्व मोबाईल आणि फिक्स्ड-लाइन कनेक्शन्स, वापर बंद ठेवण्याचा 90 दिवसांच्या कालावधीच्या समाप्तीनंतर 365 दिवसानी दूरसंचार सेवा प्रदात्याद्वारे (TSPs) अनिवार्यपणे निष्क्रिय केले जातील.
E. मोबाईल आणि मशीन-टू-मशीन (M2M) साठी नंबरींग संसाधने:
- वर्तमान आणि भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी 13-अंकी M2M नंबरींग संसाधने पुरेशी आहेत.
- 10-अंकी मोबाईल नंबरींग मालिका वापरणाऱ्या सर्व सिम-आधारित M2M कनेक्शन्स 13-अंकी M2M संप्रेषणाकडे वळवल्या जाव्यात, असे सांगणारी ट्राय ची दूरसंचार विभागाने स्विकारलेली शिफारस जलदगतीने अंमलात आणणार आहे.
F. इतर नंबरींग संसाधने -स्तर-1 शॉर्टकोड:
- विनामुल्य आणि फक्त सरकारी संस्थांना वाटप करणे.
- शॉर्टकोडचे वार्षिक वापर लेखापरीक्षण केले जाईल. निष्क्रीय शॉर्टकोड गुणवत्तेनुसार, वापरकर्ता संस्थांशी सल्लामसलत करून रद्द केले जातील.
ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर या शिफारसी देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही स्पष्टीकरणासाठी किंवा माहितीसाठी अब्दुल कयुम, सल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण), ट्राय यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाऊ शकतो. क्रमांक +91-11-20907757.
* * *
S.Patil/Sushma/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2100470)
Visitor Counter : 11