इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजे व्हेव्ज 2025 मध्ये केले जाणार, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपायांचे अनावरण


क्रिएट इन इंडिया चॅलेंज चा भाग असलेल्या ट्रुथ टेल किंवा सत्य कथन हॅकेथॉन मध्ये जगभरातील 5,600 पेक्षा अधिक जणांनी केली नोंदणी, यामध्ये 36% सहभाग महिलांचा

मार्गदर्शन, निधी आणि पुरस्कारांसाठी 10 लाख रुपयांची तरतूद: दिशाभूल करणाऱ्या आशयापासून प्रेक्षकांचे संरक्षण करण्याचे आव्हान स्वीकारा, नैतिक पत्रकारितेला प्रोत्साहन द्या

नोंदणी लवकरच बंद होत आहे ! 21 फेब्रुवारी 2025 पूर्वी सत्य कथन हॅकेथॉन मध्ये सहभागी व्हा

Posted On: 04 FEB 2025 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025 

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या सहकार्याने ट्रुथटेल हॅकेथॉन आव्हानाची घोषणा केली आहे. ही हॅकेथॉन स्पर्धा म्हणजे आगामी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात  व्हेव्ज 2025 च्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सी आय सी) उपक्रमाच्या सीझन एक चा भाग आहे. थेट प्रक्षेपणामध्ये दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय विकसित करण्याच्या उद्देशाने हे आव्हान एक आद्य उपक्रम आहे.

हॅकिंग द होक्स

आजकालच्या माध्यमांच्या अत्यंत वेगवान वातावरणात, चुकीची माहिती वेगाने पसरते, विशेषतः थेट प्रक्षेपणादरम्यान असे प्रकार अधिक होतात. अशा प्रकारची चुकीची, असत्य माहिती शोधून काढणे हे प्रक्षेपक, पत्रकार आणि पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठीही एक आव्हान आहे.

या अंतर्गत, हॅकेथॉन डेव्हलपर, डेटा शास्त्रज्ञ  आणि माध्यम  व्यावसायिकांना ज्या त्या वेळीच चुकीची माहिती शोधण्यासाठी आणि तथ्य पडताळणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने तयार करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी दहा लाख रुपयांचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. विजेत्या संघाना रोख पारितोषिक, मार्गदर्शनाच्या संधी आणि अग्रणी व्यवसायिकांकडून सहाय्य मिळेल.

या हॅकेथॉनला आजपर्यंत अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला असून जगभरातील 5,600 पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे, यामध्ये 36% सहभाग महिलांचा आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • थेट प्रक्षेपणामधील माहितीचा ज्या त्या वेळी शोध घेऊन माहितीच्या पडताळणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने विकसित करणे.
  • माध्यम परिदृश्यामध्ये विश्वास आणि पारदर्शकता वाढवणे.
  • बातम्यांच्या वार्तांकनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक वापर करायला प्रोत्साहन देणे.

हॅकेथॉनचे टप्पे आणि मुख्य तारखा:

  • प्रोटोटाइप सबमिशनची अंतिम मुदत: 21 फेब्रुवारी 2025
  • अंतिम सादरीकरणे: मार्च 2025 अखेर
  • विजेत्यांची घोषणा: WAVES परिषद  2025

सहभागासाठी अधिक माहितीकरता आणि नोंदणीसाठी https://icea.org.in/truthtell/ या संकेतस्थळाला भेट द्या.

सहाय्यक भागीदार

माध्यम तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि प्रसारण मानकांचे पालन करण्यासाठी इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या समर्पणाला अधोरेखित करत, या हॅकेथॉनला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), IndiaAI मिशन आणि DataLEADS यासह प्रमुख भागीदारांनी पुरस्कृत केले आहे;

आय सी इ ए विषयी

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ही भारतातील मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च उद्योग संस्था असून भारताच्या डिजिटल परिसंस्थेला  बळकट करण्यासाठी नवकल्पना, धोरणांच्या संचाला समर्थन आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देते.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2099608) Visitor Counter : 54