पर्यटन मंत्रालय
रणभूमी ॲप
Posted On:
03 FEB 2025 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025
भारतीय सशस्त्र दलांच्या बलिदानाचे महत्त्व सांगणारी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि शौर्याचे प्रतीक असलेली ठिकाणे नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यासाठी रणभूमी ॲप आणि भारत रणभूमी दर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अशा प्रकारच्या 77 शौर्य गंतव्य स्थानांची राज्यनिहाय यादी परिशिष्टात दिली आहे.
भारतीय लष्कराने राज्य सरकारे आणि पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने या संवेदनशील आणि दुर्गम स्थानांवर जोखीम कमी करणाऱ्या आणि सुरक्षेच्या उपाययोजना खालील प्रमाणे केल्या आहेतः
- संपर्क आणि सहाय्याचे लष्करी ठिकाण- अतिजोखमीच्या सीमावर्ती भागात अभ्यागतांनी लष्करी युनिट्ससोबत सुरक्षा आणि मंजुरीसाठी एक खिडकीच्या द्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधेद्वारे समन्वय साधला पाहिजे. जास्त उंचीवरील प्रदेशात सावधगिरीचा अवलंब करण्याच्या तसेच तिथल्या वातावरणासोबत जुळवून घेण्याच्या नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला देखील दिला जात आहे.
- नियंत्रित सुविधा आणि परवाने- जास्त उंचीवरील विशिष्ट स्थानांवर प्रवेश नियंत्रित आहे आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष परवाने जारी केले जातात.
- आकस्मिक प्रतिसाद आणि वैद्यकीय मदत- या भागामध्ये काही घटना घडल्यास जिल्हा रुग्णालये उपलब्ध आहेत. तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी लष्कराच्या आकस्मिक मदत नियमावलीचे पालन केले जाते.
- हवामानविषयक सूचना- जास्त तीव्र परिस्थितीत दुर्घटना टाळण्यासाठी हवामानविषयक सूचना केल्या जातात.
- पर्यटन आणि पर्यावरणविषयक मार्गदर्शक सूचना- अतिशय नाजूक परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी आणि जबाबदार प्रवास सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन दिले जात आहे.
पायाभूत सुविधा वृद्धी आणि सुविधांचा विकास:
- भारत रणभूमी दर्शन उपक्रम एक जागरुकताकारक आणि डिजिटल एन्गेजमेंट प्लॅटफॉर्म म्हणून काम करत आहे.
- सध्या या ठिकाणांवर युद्ध स्मारके/ संग्रहालये आणि अल्पोपाहार व विश्रांतीसाठी सुविधा आहेत. संबंधित राज्य-प्रणीत योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
ANNEXURE
State-wise details of 77 Shaurya Gantavya sites
STATE
|
SHAURYA GANTAVYA SITES
|
TOTAL NUMBER OF SITES
|
Jammu & Kashmir
|
Gurez Sector
|
11
|
Bangus Valley
|
Aru Vally
|
Yusmarg Valley
|
Warman Valley
|
Chandigram
|
Keren
|
Machil
|
Teetwal
|
Baramulla
|
Uri
|
Himachal Pradesh
|
Spiti Valley
|
04
|
Kinnaur Valley
|
Kalpa Valley
|
Sangla Valley
|
Rajasthan
|
Longewala
|
07
|
Tanot
|
Ramgarh
|
Sundra
|
Munabao
|
Gadra Road
|
Bhakasar
|
Gujarat
|
Koteshwar
|
05
|
Suigam Rann Reigon
|
Kutch Region
|
Lakhpat
|
Bhuj
|
Ladakh
|
Galwan Valley
|
14
|
Kargil
|
Siachen Base Camp
|
Karakoram Pass
|
Pangong TSO
|
Demchok
|
Padum Valley
|
Hanle
|
Chushul
|
Hunder
|
Tayakshi
|
Turtuk
|
Tasking
|
Panamik
|
Sikkim
|
Doklam
|
07
|
Gurudongmar
|
Thangu Region
|
Lachung Region
|
Geyzing
|
Yuksom
|
East Sikkim Reigon
|
Arunachal Pradesh
|
Tawang
|
21
|
Walong
|
Dirang
|
Bum La
|
Sungetsar
|
Zemithang
|
Gorsam
|
Lumpo
|
Bomdila
|
Lohit
|
Kameng Region
|
Bishum Valley
|
Dibang Region
|
Anini
|
Menchuka Region
|
Siang Region
|
Yingkiong
|
Gelling
|
Upper Subansiri Valley
|
Tsari Chu Valley
|
Tuting Valley
|
Uttrakhand
|
Lipulekh Pass
|
08
|
Pithoragarh
|
Harsil Sector
|
Mana Sector
|
Malari Sector
|
Kumaon Region
|
Dharchula
|
Gunji
|
* * *
S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2099296)
Visitor Counter : 52