श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-श्रम: असंघटित कामगारांसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा


ई-श्रम पोर्टलवर 30.58 कोटीहून अधिक असंघटित कामगार नोंदणीकृत

Posted On: 03 FEB 2025 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025

 

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा आधार संलग्न एक व्यापक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरू केले. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) देऊन स्व-घोषणा आधारावर त्यांची नोंदणी आणि त्यांना सहाय्य  करण्यासाठी आहे. 

28 जानेवारी 2025 पर्यंत, 30.58 कोटीहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 दरम्यान  ई-श्रम पोर्टलवर दररोज सरासरी  33.7 हजार नोंदणीसह 1.23 कोटींहून अधिक  नोंदणीची  नोंद झाली आहे.

असंघटित कामगारांपर्यंत विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहचावा यासाठी ई-श्रम हा वन-स्टॉप-सोल्यूशन म्हणून विकसित करण्याबाबत अलिकडील अर्थसंकल्पीय घोषणेला अनुसरून श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ई-श्रम- “वन-स्टॉप-सोल्यूशन” सुरू केले.”  ई-श्रम- "वन-स्टॉप-सोल्यूशन" मध्ये विविध सामाजिक सुरक्षा/कल्याणकारी योजनांचे एकाच पोर्टलवर म्हणजेच ई-श्रम वर एकत्रीकरण केले आहे. यामुळे ई-श्रमवर नोंदणीकृत असंघटित कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती पोहचते आणि ई-श्रम च्या माध्यमातून ते आतापर्यंत  मिळवलेले फायदे पाहू शकतात.

आतापर्यंत, विविध केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या 12 योजना ई-श्रम वर एकत्रित/मॅप करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी, पीएम आवास योजना- शहरी,  पीएम  आवास योजना- ग्रामीण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यांचा समावेश आहे.

ई-श्रम पोर्टलची सुलभता वाढवण्यासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 7 जानेवारी 2025 रोजी ई-श्रम पोर्टलवर भाषिणी  प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध भाषांमध्ये ते सुरु केले आहे.  यामुळे आता कामगारांना 22 भारतीय भाषांमध्ये ई-श्रम पोर्टलशी संवाद साधता येईल , सर्वांसाठी सुलभता वाढेल आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल.  

केंद्रीय श्रम  आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2099240) Visitor Counter : 66