संरक्षण मंत्रालय
एलएसएएम 23 (YARD 133) या स्फोटके तथा टॉर्पेडो तथा क्षेपणास्त्र बार्जचे (ACTCM) उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2025 1:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025
9 व्या ACTCM बार्जचे अर्थात LSAM 23 (Yard 133) या जहाजभेदी ताफ्याचे उद्घाटन ठाणे येथील मेसर्स सूर्यदत्त प्रोजेक्टस प्रा. लि. कंपनी येथे झाले. नौदलाच्या मुंबई विभागाचे AGM (COM) कमांडर आर. आनंद या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

5 मार्च 21 रोजी एमएसएमइ शिपयार्ड, मेसर्स सूर्यदत्त प्रोजेक्टस प्रा. लि. ठाणे या कंपन्यांनी 11 स्फोटके तथा टॉर्पेडो तथा क्षेपणास्त्र बार्ज बांधण्याचे कंत्राट पूर्ण केले. शिपयार्डने भारतीय जहाज आरेखन कंपनी व भारतीय जहाज नोंदणी (IRS) यांच्या सहयोगाने हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बार्ज बांधले आहेत. याच्या प्रारुपाची समुद्रातील कामगिरीची चाचणी विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत (NSTL) घेण्यात आली होती. शिपयार्डने आतापर्यंत 8 बार्ज यशस्वीरित्या नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. हे बार्ज नौदलाकडून त्यांच्या विविध सुधारित उपक्रमांसाठी वापरण्यात आले आहेत. भारतीय नौदलाच्या जेट्टीपर्यंत तसेच बाहेरील बंदरांपर्यंत सामान अथवा शस्त्रास्त्रांची वाहतूक करुन ते जहाजावर चढवणे आणि उतरवणे यासाठी या बार्जचा उपयोग करण्यात आला.
भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांच्या यशस्वितेचे हे बार्ज म्हणजे गौरवास्पद उदाहरण आहे.

* * *
H.Raut/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2098418)
आगंतुक पटल : 85