संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘यंग प्रेसिडेंटस ऑर्गनायझेशन’ च्या जागतिक शिष्टमंडळाची घेतली भेट
Posted On:
29 JAN 2025 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2025
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल - 28 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयात वायपीओ म्हणजेच ‘यंग प्रेसिडेंटस ऑर्गनायझेशन’च्या जागतिक शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळाची भेट हिरो मोटर्स कंपनीने आयोजित केली होती. या शिष्टमंडळामध्ये इस्रायल, अमेरिका, यूके, कोस्टा रिका आणि भारताचे सदस्य होते.
यावेळी रिजिजू म्हणाले की यावेळी शिष्टमंडळाबरोबर नवोन्मेष, सहकार्य आणि प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन या विषयांवर चर्चा झाली.
समाज माध्यम ‘एक्स’ वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, केंद्रीय मंत्र्यांनी वायपीओ जागतिक शिष्टमंडळाला त्यांच्या उद्देशपूर्ण आणि संस्मरणीय भेटीसाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, शिष्टमंडळाचे सदस्य भारताच्या संसद भवनाची नवीन भव्य वास्तू पाहून खूप प्रभावित झाले आहेत.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097322)