संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दल आणि इंडोनेशियाचे तटरक्षक दल यांनी सामंजस्य कराराचे आणखी तीन वर्षांसाठी केले नूतनीकरण
Posted On:
28 JAN 2025 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
भारतीय तटरक्षक दल आणि इंडोनेशिया तटरक्षक दल (बदान केमनन लॉट रिपब्लिक इंडोनेशिया - बाकामला) यांनी 27 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील तटरक्षक मुख्यालय येथे झालेल्या दुसऱ्या उच्च-स्तरीय बैठकीदरम्यान सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्यावरील त्यांच्या सामंजस्य कराराचे आणखी तीन वर्षांसाठी नूतनीकरण केले. या बैठकीचे नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक जनरल परमेश शिवमणी आणि बाकामला चे चीफ व्हाईस ॲडमिरल इरवांस्याह यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय शिष्टमंडळाने केले होते, जे सामंजस्य करारातील तरतुदींनुसार 24-28 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.
सागरी शोध आणि बचाव, प्रदूषण प्रतिसाद आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी यांसारख्या क्षेत्रांमध्ये परिचालनात्मक सहकार्याला चालना देण्यावर बैठकीत चर्चा झाली. दोन्ही देशांनी हिंद-प्रशांत क्षेत्राची सुरक्षा आणि लवचिकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यावर आणि व्यावसायिक आदानप्रदान कायम राखण्यावर भर दिला.
दोन्ही देशांमधील संबंध अधोरेखित करत बाकामला सोबत परिचालन संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जहाज शौनक सध्या 27-30 जानेवारी 2025 या कालावधीत जकार्ता येथे तैनात आहे. नूतनीकरण करण्यात आलेला करार सुरक्षित आणि सहकार्यात्मक सागरी वातावरणाला चालना देण्याप्रति भारत आणि इंडोनेशियाची वचनबद्धता अधोरेखित करतो.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2097137)
Visitor Counter : 26