संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 : राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेची महाअंतिम फेरी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार
Posted On:
21 JAN 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत होणार आहे, तर कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण सचिव आणि शिक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्या हस्ते होणार आहे.
प्रत्येक विभागामधील चार (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभाग ) असे एकूण 16 बँड संघ असून त्यामधील 466 मुले महाअंतिम फेरीत सहभागी होतील. देशभरातील शाळांमधील मुलांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना पुनरुज्जीवित आणि प्रज्वलित करण्यासाठी तसेच त्यांना सर्वांगीण शिक्षणाच्या मार्गावर प्रोत्साहित करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे.
S No
|
School
|
Category
|
(a)
|
North Sikkim Academy, Nangan, Sikkim (Eastern Zone)
|
Pipe Band Boys
|
(b)
|
PM SHRI Kendriya Vidyalaya No. 2 Belagavi Cantt. Karnataka (Southern Zone)
|
(c)
|
Rajarambapu Patil Military School & Sports Academy Islampur, Sangli, Maharashtra (Western Zone)
|
(d)
|
City Montessori School, Kanpur Road Lucknow, Uttar Pradesh (Northern Zone)
|
(e)
|
St. Joseph's Convent Sr. Sec. School, Idgah hills, Bhopal, Madhya Pradesh (Western Zone)
|
Brass Band Girls
|
(f)
|
Government Sr. Sec. School West Point, Gangtok, Sikkim (Eastern Zone)
|
(g)
|
St Joseph's Anglo Indian Girl's Higher Secondary School, Kozhikode, Kerala (Southern Zone)
|
(h)
|
Gayatri Vidyapeeth, Shantikunj, Haridwar, Uttrakhand (Northern Zone)
|
(i)
|
Shri Thakurdwara Balika Vidyalaya, Ghaziabad, Uttar Pradesh (Northern Zone)
|
Pipe Band Girls
|
(j)
|
Bhonsala Military School Girls, Nasik, Maharashtra (Western Zone)
|
(k)
|
Monte CBSE School, Kurnool, Pandipadu Village, Kallur Mandal Kurnool, Andhra Pradesh (Southern Zone)
|
(l)
|
PM Shri Kasturba Gandhi Balika Vidyalaya, Patamda, East Singhbum, Jharkhand (Eastern Zone)
|
(m)
|
Pinegrove School, Subathu, District-Solan, Himachal Pradesh (Northern Zone)
|
Brass Band Boys
|
(n)
|
Prince Lotus Valley Academy, Sikar, Rajasthan (Western Zone)
|
(o)
|
St. Xavier's English Medium School, Pathalgaon, Chhattisgarh (Southern Zone)
|
(p)
|
St. Xavier’s Higher Secondary School, Pathaliaghat, Sepahijala, Tripura (Eastern Zone)
|
प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम - रु. 21,000/-, द्वितीय - रु. 16,000/- आणि तृतीय - रु. 11,000/-), चषक तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000/- चे उत्तेजनार्थ रोख पारितोषिक दिले जाईल. सशस्त्र दलांच्या प्रत्येक विभागातील सदस्यांसह संरक्षण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या परीक्षक मंडळाद्वारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल.
34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 700 हून अधिक शालेय बँड संघांनी राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी नोंदणी केली, ज्यामध्ये सुमारे 14,000 मुलांचा समावेश असलेले 568 संघ सहभागी झाले होते. विभागीय स्तरावर, 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 2,337 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या 84 संघांनी भाग घेतला, त्यापैकी 16 अंतिम संघांना महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आहे.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094865)
Visitor Counter : 22