सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने महाकुंभ 2025 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील खादी प्रदर्शनाचे केले उद्घाटन

Posted On: 18 JAN 2025 7:52PM by PIB Mumbai

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी शुक्रवारी  सेक्टर-1, महात्मा गांधी मार्ग, कुंभ नगरी, प्रयागराज येथे महाकुंभमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खादी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे प्रदर्शन प्रयागराज येथे 26 फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात आले आहे. ज्यामध्ये एकूण 152 दालने आहेत. यापैकी 98 दालने खादी उत्पादनांसाठी असून उर्वरित 54 दालने ग्रामोद्योगाच्या उत्पादनांसाठी आहेत. 

उद्घाटनाच्या वेळी उपस्थितांना संबोधित करताना, केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, महाकुंभ हा केवळ श्रद्धेचा महोत्सव नाही, तर तो भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्वयंपूर्णतेचे देखील प्रतीक आहे. जी 'खादीमहात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भरता आणि स्वदेशीचे प्रतीक बनली, ती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'चरखा क्रांती' द्वारे आत्मनिर्भर भारताची ओळख बनली आहे. 

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या आवाहनाअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग  नव्या उंचीवर पोहोचत आहेत. 

या प्रदर्शनात भारतातील 20 हून अधिक राज्यांमधील उत्पादने मांडण्यात आली आहेत. काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून नागालँडपर्यंत विविध उत्पादने यामध्ये समाविष्ट आहेत. अध्यक्षांनी भाविक आणि अभ्यागतांना  खादी प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांचा अवलंब करण्याचे आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराजला जागतिक आध्यात्मिक केंद्र बनवण्यासाठी कुंभ चे  भव्य आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. त्यांनी सर्व भाविकांना खादी उत्पादनांचा स्वीकार करून आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात योगदान देण्याचेही आवाहन केले. हे प्रदर्शन भारतीय संस्कृती आणि स्वयंपूर्णतेचे  जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. 

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2094178) Visitor Counter : 33