संरक्षण मंत्रालय
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला दिली भेट
Posted On:
13 JAN 2025 8:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी आज दिनांक13 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील कँटोनमेंट भागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी ) प्रजासत्ताक दिन शिबिर -2025 ला भेट दिली. भारताचे भविष्य तरुणांच्या हातात आहे,या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारताच्या लोकसंख्येच्या 27% लोकसंख्या तरुणांची आहे, हे वास्तव लक्षात घेता तरुण आणि प्रज्वलित मनेच देशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, यावर संरक्षण कर्मचारी प्रमुखांनी जोर दिला.एक पेड माँ के नाम, पुनीत सागर अभियान, एक भारत श्रेष्ठ भारत शिबिरे आणि मावळणकर शुटिंग चॅम्पियनशिप अशा विविध सरकारी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये छात्रांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीवर आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.
जानेवारी हा राष्ट्रीय महत्त्वाचा महिना आहे, या महिन्यात युवा दिन,लष्कर दिन आणि प्रजासत्ताक दिन असे प्रमुख दिवस येतात,याकडे जनरल अनिल चौहान यांनी लक्ष वेधले.सोहनलाल द्विवेदी यांच्या ‘लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालोंकी हार नहीं होती’या कवितेच संदर्भ देत उद्धृत करत नेहमी उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील रहा, कधीही हार मानू नका आणि जीवनात आशावादी राहण्यासाठी छात्रांना प्रोत्साहन देत आपल्या भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, त्यांनी छात्र सेनेच्या च्या तिन्ही शाखांच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चा आढावा घेतला. यानंतर केरळच्या न्यूमन कॉलेज (गर्ल्स) यांच्या बँडने शानदार बँडवादन केले.त्यानंतर छात्र सेनेच्या सर्व 17 संचालनालयातील छात्रांनी संचलनासाठी तयार केलेल्या विविध सामाजिक जनजागृती संकल्पनांवर आधारित ‘ध्वज क्षेत्राची’ पाहणी केली आणि त्यावेळी त्यांना संबंधित मॉडेल्सची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘हॉल ऑफ फेम’ ला भेट दिली जिथे त्यांना एनसीसीचा इतिहास, प्रशिक्षण आणि यशाबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर संरक्षण प्रमुख आणि इतर उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी प्रताप सभागृहात कॅडेट्सनी सादर केलेल्या ‘सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद’ घेतला.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092632)
Visitor Counter : 15