मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पशुधन अर्थव्यवस्थेतील परिवर्तनः केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते उद्या पुण्यात भव्य “उद्योजकता विकास परिषदचे” उद्घाटन
Posted On:
12 JAN 2025 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025
मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने उद्या 13 जानेवारी 2025 रोजी पुणे इथे “उद्योजकांचे सक्षमीकरणः पशुधन अर्थव्यवस्थेचं परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित उद्योजकता विकास परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहातील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा प्रज्ञा मुंडे आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहातील. पशुधन संवर्धन सचिव आणि मुख्य सचिवांसह विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
पशुधन क्षेत्राची क्षमता उलगडण्यासाठी धोरणकर्ते, महासंघ, सहकारी संस्था, औद्योगिक संघटना, उद्योजक आणि वित्तीय संस्थांना एकत्र आणणे हा या उद्योजकता विकास परिषदेचा उद्देश आहे. परिषद भागधारकांना आव्हानांवर चर्चा करणे, त्यावरचे उपाय सामायिक करणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शाश्वत पद्धती प्रदान करण्यासाठी एक मंच प्रदान करेल. भारत सरकार 29110.25 कोटी रुपये खर्चासह पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी आणि 2300 कोटी रुपये खर्चासह राष्ट्रीय पशुधन अभियान सारख्या प्रमुख योजना राबवत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान आणि एएचआयडीएफ अंतर्गत संधींचे प्रदर्शन करून, परिषदेत सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण शेतकरी आणि लहान उद्योगांना सक्षम कऱण्याचा प्रयत्न असेल.
उद्योजकता विकास परिषदेत, राष्ट्रीय पशुधन अभियान-उद्योजकता विकास कार्यक्रम (एनएलएम-ईडीपी) डॅशबोर्डचं उद्घाटन होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला संपूर्ण प्रकल्पाच्या मुख्य माहितीचा सुव्यवस्थित अहवाल उपलब्ध होईल. . तसेच एएचआयडीएफ आणि एनएलएम-ईडीपी अंतर्गत 545.04 कोटी रुपयांच्या 40 प्रकल्पांचे उद्घाटन , राष्ट्रीय पशुधन योजनेची मार्गदर्शक तत्वे 2.0 आणि यशोगाथांच्या पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.
* * *
S.Kane/V.Salvi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092214)
Visitor Counter : 44