विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एआय आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान आता एक पर्याय नव्हे तर एकमेव पर्याय असेल, मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा सर्वोत्तम वापर हे आव्हान,” केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे सायबर सिक्युरिटी, एआय आणि ब्लॉकचेनवरील राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन

Posted On: 08 JAN 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे यापुढे केवळ पर्याय असणार नाहीत तर त्यांना भविष्यात एकमेव व्यवहार्य पर्याय म्हणून त्यांना पसंती राहील  असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशद केले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे आज सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या  राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना डॉ. सिंग यांनी, "मानव जातीला याचा फायदा होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम  वापर  हे आव्हान आहे," असेही सांगितले.

PH4.JPG

सध्याच्या काळात सरकार आणि समाजाला  ज्या आव्हानांवर मात करावी लागेल अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अशा परिसंवादांचे महत्त्व डॉ. जितेंद्र सिंह  यांनी स्पष्ट केले.

सायबर सुरक्षा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने ही  जगासाठी चिंतेची बाब असून भारतही त्याला अपवाद नसल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसंबंधीच्या दृष्टीमुळे गेल्या दशकात तांत्रिक विकासाचा वेग वाढल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि, तंत्रज्ञान ही दुधारी तलवार असल्याने वाईट हेतू बाळगणाऱ्यांकडून या प्रगतीचा अयोग्य पद्धतीने वापर होण्याची शक्यता असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

PH2.JPG

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्र्यांनी नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांचाही उल्लेख केला.

तंत्रज्ञानामुळे उद्भवणारी आव्हाने तंत्रज्ञानाचा वापर करूनच हाताळणे आवश्यक असल्याचेही डॉ. सिंह  यांनी नमूद केले. एआय हे वर्चस्व गाजवण्याचे साधन न राहता लोकांसाठी सहाय्यक असले पाहिजे असेही ते म्हणाले.

इतर देशांसाठी मॉडेल म्हणून काम करत असलेल्या CPGRAMS पोर्टलद्वारे तक्रारींचे विश्लेषण आणि निराकरण करण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो यावर त्यांनी  प्रकाश टाकला. तंत्रज्ञानाच्या भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी सध्याचे सरकार अशासकीय संस्थांशी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

PH1.JPG

गेल्या दशकात स्टार्टअप्सच्या संख्येत वाढ झाल्याचे अधोरेखित करत भारतातील स्टार्टअप्सच्या संख्येत अवघ्या 350 वरून सुमारे  1,900 एवढी लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचे भविष्य, सायबर सुरक्षा आणि भारताचे भविष्य घडवण्यात एआय आणि ब्लॉकचेनची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी ही परिषद महत्त्वाचे व्यासपीठ ठरली.

 

* * *

N.Chitale/M.Ganoo/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091240) Visitor Counter : 18


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil