नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने सलग चौथ्या वर्षी सामंजस्य करार कामगिरीमध्ये मिळवले उत्कृष्ट मानांकन

Posted On: 08 JAN 2025 11:38AM by PIB Mumbai

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. 


गेल्या तीन वर्षात आयआरईडीएने सातत्याने उत्तम कामगिरी करून 2022-23 मध्ये 93.50, 2021-22 मध्ये 96.54 आणि 2020-21 मध्ये 96.54 गुणांसह सर्वोत्तम मानांकन प्राप्त केले. भारताच्या नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यामध्ये या संस्थेची वचनबद्धता या सातत्यपूर्ण कामगिरीने अधोरेखित होत आहे. या कामगिरीविषयी बोलताना आयआरईडीएचे सीएमडी प्रदीप कुमार दास यांनी सांगितले, “ सलग चौथ्या वर्षी सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवणे आयआरईडीएसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही कामगिरी, आमच्या कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न, आमच्या हितधारकांचा अढळ विश्वास आणि भारत सरकारचे मार्गदर्शन यांना प्रतिबिंबित करत आहे. या यशामध्ये ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीची लक्ष्ये साध्य करण्यासाठी आम्ही सर्व जण वचनबद्ध आहोत.”
 

आयआरईडीएच्या सीएमडींनी केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, ऊर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, एमएनआरई चे सचिव प्रशांत कुमार सिंह आणि मंत्रालयाचे आणि संचालक मंडळाचे अधिकारी यांचे त्यांच्या पाठबळाबद्दल आणि बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

***

SonalT/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091110) Visitor Counter : 26


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu