वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगाल मध्ये फुलिया, नादिया, येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या नवीन वास्तुचे (कॅम्पस) केले उद्घाटन
“2030 वर्षापर्यंत 300 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ कमावण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय कटिबद्ध असून वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील 6 कोटी लोकांना रोजगारही उपलब्ध करून देईल” - श्री गिरीराज सिंह
Posted On:
05 JAN 2025 10:29AM by PIB Mumbai
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले. संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त आहे. ही नवीन वास्तू, अध्ययनाचे एक आदर्श स्थान ठरेल, हातमाग आणि कापड तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचे केंद्र म्हणून काम करेल, तसेच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीममधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवेल.
भारतातील सर्व IIHT मिळून सर्वोच्च 10 श्रेणीधारकांना (रँक होल्डर) पदके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आली.
या उद्घाटन कार्यक्रमात, सर्व 06 केंद्रीय IIHT साठी, एकत्रिकृत संकेतस्थळ सुरु करण्यात आले.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते “कॉम्प्युटर-एडेड फिगर्ड ग्राफ डिझायनिंग फॉर जॅकवर्ड विव्हिंग” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
गिरीराज सिंह यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, हातमाग विणकरांच्या ‘विकास आणि प्रगती’साठी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विविध योजना देत असलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. मंत्र्यांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह ही संस्था पश्चिम बंगालला अर्पण केली आणि या संस्थेतील प्रथम वर्षाच्या प्रवेश संख्येत सध्याच्या 33 वरून 66 पर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले. हातमाग विणकरांच्या मुलांना या संस्थेत शिक्षण घेऊन पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीम या राज्यांमधील हातमाग उद्योगात सेवा बजावण्याची संधी मिळेल.
***
S.Pophale/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090285)
Visitor Counter : 46