निती आयोग
‘फराळ शक्ती’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिला उद्योजकता मंचाची मीरा भाईंदर महानगर पालिकेसोबत भागिदारी
पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांचे उत्पादन घेण्याकरता महिला उद्योजकांना पाठबळ देण्यावर भर दिला जाणार
या उपक्रमाअंतर्गत महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय उद्योगासाठी आवश्यक साधने, कौशल्य आणि संधी प्रदान केल्या जाणार
देशभरातील अशाच प्रकारच्या इतर उपक्रमांसाठी आदर्श उपक्रमाचे प्रारुप
Posted On:
03 JAN 2025 11:27AM by PIB Mumbai
मिरा - भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा - भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) फराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे. पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांच्या उत्पादनात व्यवसायाशी जोडलेल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायाचा शाश्वत पद्धतीने आणि परिणामकारित्या विस्तार करता यावा या उद्देशाने, अशा महिला उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत या महिला उद्योजकांना सर्वंकष प्रशिक्षण आणि आवश्यक पाठबळ दिलं जाणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी मीरा - भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) नीती आयोगाच्या महिला उद्योजकता मंचासोबत (Women Entrepreneurship Platform - WEP) सहकार्यपूर्ण भागिदारी केली असून, महिला उद्योजकता मंचाच्या अवार्ड टू रिवॉर्ड या उपक्रमांतर्गत फराळ सखी या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभही केला आहे.
2018 मध्ये निती आयोगाअंतर्गत महिला उद्योजकता मंच (Women Entrepreneurship Platform - WEP) या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. त्यावेळी माहिती साठ्याचे संकलन करणारा मंच म्हणून निती आयोगाअंतर्गत या उपक्रमाचा अंतर्भाव केला गेला होता. त्यानंतर हा उपक्रम सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या भागिदारीअंतर्गत परावर्तीत केला केला. महिला उद्योजकांसंबंधीच्या माहितीतील विषमतेच्या आव्हानावर मात करून महिला उद्योजकांना सक्षम बनवणे आणि त्यासाठी आर्थिक सेवा सुविधांची सुलभ उपलब्धता, बाजारपेठांची उपलब्धता, प्रशिक्षण आणि कौशल्य, मार्गदर्शन आणि संपर्क यंत्रणेचा विस्तार, अनुपालन आणि कायदेविषयक सहाय्य आणि व्यवसाय विकासाशी संबंधित सेवा सुविधा अशा सर्व आवश्यक बाबींबद्दल सातत्यपूर्ण सहकार्य प्रदान करणे हा महिला उद्योजकता मंचाचा उद्देश आहे.
महिला उद्योजकांना सणासुदीच्या पारंपरिक खाद्य पदार्थांच्या अर्थात फराळाच्या उत्पादन आणि विक्री प्रक्रियेशी जोडून घेत, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा ‘फराळ सखी’ या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी मीरा भाईंदर महानगर पालिकेने एक केंद्रीकृत स्वयंपाकघर उभारले आहे. या स्वयंपाकघरात बचत गटातील महिलांना असे पदार्थ व्यावसायिक तज्ञतेने बनवण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. यासोबतच मीरा भाईंदर महानगर पालिका या महिला उद्योजकांना त्यांच्या फराळाच्या पदार्थांच्या विक्रीसाठीही विशेष जागा उपलब्ध करून देत तसेच महानगर पालिकेच्या वतीने त्यांच्या उत्पादनांचा जाहिरातीद्वारे प्रचार प्रसार करत त्यांना पाठबळही देत आहे. अलिकडेच झालेल्या दिवाळी सणांच्या वेळी या उपक्रमाला लक्षणीय यश मिळाले. उत्तम दर्जाच्या फराळाच्या पदार्थांचा उत्तम दर्जा आणि चव यामुळे दिवाळी सणाच्या काळात 3 टनांपेक्षा जास्त फराळच्या पदार्थांची विक्री झाली होती.
आता या उपक्रमाअंतर्गत मिरा भाईंदर मधील 25 महिलांची निवड करून त्यांना व्यवसाय उद्योग संचलनविषयक तात्रिंक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेंटर फॉर एज्युकेशन, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी फाऊंडेशनच्या वतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिला उद्योजकांना शाश्वत उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठीची कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करता येईल, आणि या माध्यमातून त्यांना स्थानिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत स्वतःचे योगदानही देता येणार आहे.
महिला उद्योजकता मंच हा सरकार, व्यवसाय, परोपकार/दान आणि समाजातील सर्व स्तरातल्या भागधारकांना एक मंच प्रदान करतो , ज्यामुळे महिला उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर शाश्वत आणि प्रभावी कार्यक्रमांच्या दिशेने त्यांनी घेतलेल्या पुढाकारांना सहकार्य, एकत्रीकरण आणि संरेखित करने शक्य होते. 2023 मध्ये, WEP ने अवॉर्ड टू रिवॉर्ड कार्यक्रम सुरू करून भागीदारीला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले ज्या अंतर्गत महिला उद्योजकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी भागधारक एकत्र येतात आणि यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार देखील करतात. WEP अंतर्गत ‘अवॉर्ड टू रिवॉर्ड’ उपक्रम प्रभावी उद्योग विकसित करण्यासाठी भागधारकांसाठी प्लग-अँड-प्ले फ्रेमवर्क/सुविधा प्रदान करते. हे सहकार्य महिला उद्योजकांना देशांतर्गत बाजारपेठांमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि त्यांचे व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविण्यावर लक्ष केंद्रित करते. 30,000 हून अधिक महिला उद्योजक आधीच WEP शी जोडलेल्या आहेत, MBMC सोबतच्या या भागीदारीचा उद्देश मीरा भाईंदरमधील महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांसाठी एक भरभराट करणारी परिसंस्था निर्माण करणे आहे. या अवॉर्ड टू रिवॉर्ड ATR साठी WEP Partner Appreciate आर्थिक सहाय्य देखील प्रदान करेल.
"महिला-नेतृत्वाखालील विकास साधण्यासाठी महिला उद्योजकांना पाठिंबा देणे अत्यावश्यक आहे. WEP महिला उद्योजकांना प्रशिक्षण, कौशल्य, संसाधन उपलब्धता आणि माहिती, मार्गदर्शक आणि नेटवर्क्स सोबत सर्वसमावेशक पाठिंबा प्रदान करते. WEP महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबन साध्य करून देण्यासाठी तीन मार्गदर्शक तत्त्वांवर कार्य करते: इच्छा शक्ती (व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याची शक्ती), ज्ञान शक्ती (माहितीची विषमता दूर करण्यासाठी ज्ञानाची शक्ती) आणि कर्म शक्ती (मदत आणि पाठिंबा याद्वारे कृतीची शक्ती). ‘फराळ सखी’ उपक्रमाला ‘अवॉर्ड टू रिवॉर्ड’ कार्यक्रमात समाकलित करून, महिलांच्या नेतृत्वाखालील गृहउद्योगांच्या वाढीला चालना देण्यात येत आहे, ज्यामुळे लवकरच ते ‘फराळ सखी’ उपक्रम मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतरित करू शकतील. हा उपक्रम केवळ व्यवसाय निर्माण करण्यासाठीच नाही तर सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देणारा आहे,” असे श्रीमती अॅना रॉय, प्रमुख आर्थिक सल्लागार, NITI आयोग आणि मिशन डायरेक्टर, WEP यांनी सांगितले.
“फराळ सखी’ हा उपक्रम महिला उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. WEP सह या भागीदारीद्वारे, आम्ही मीरा भाईंदरच्या महिलांना शाश्वत उद्योगांचे नेतृत्व करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी तयार करत आहोत,” असे मीरा भाईंदरचे महापालिका आयुक्त संजय काटकर, म्हणाले.
***
JPS/SonalT/HK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089804)
Visitor Counter : 45