वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
घाऊक किंमत निर्देशांकाच्या (आधारभूत 2011-12) विद्यमान मालिकेचा आढावा घेण्यासाठी कार्यगटाची स्थापना
Posted On:
02 JAN 2025 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025
केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाच्या विद्यमान मालिकेत आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 अशी सुधारणा करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यगटाची रचना खालीलप्रमाणे आहे:
1.
|
प्रा. रमेश चंद, सदस्य, नीति आयोग
|
अध्यक्ष
|
2.
|
अतिरिक्त महासंचालक, फिल्ड ऑपरेशन विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय
|
सदस्य
|
3.
|
उपमहासंचालक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय
|
सदस्य
|
4.
|
उपमहासंचालक, राष्ट्रीय लेखा विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय
|
सदस्य
|
5.
|
उपमहासंचालक, उद्योग सर्वेक्षण विभाग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी कार्यालय
|
सदस्य
|
6.
|
आर्थिक सल्लागार, आर्थिक व्यवहार विभाग,
|
सदस्य
|
7.
|
सल्लागार, मूल्य आणि विपणन विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
|
सदस्य
|
8.
|
वरिष्ठ आर्थिक सल्लागार, ग्राहक व्यवहार विभाग
|
सदस्य
|
9.
|
उपमहासंचालक, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
|
सदस्य
|
10.
|
मुख्य कार्यकारी अधिकारी, वस्तू आणि सेवा कर नेटवर्क
|
सदस्य
|
11.
|
भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी
|
सदस्य
|
12.
|
डॉ. सौम्या कांती घोष, मुख्य अर्थतज्ज्ञ, एसबीआय समूह
|
सदस्य
|
13.
|
डॉ. सुरजित भल्ला, अर्थतज्ज्ञ
|
सदस्य (बिगर-सरकारी)
|
14.
|
डॉ. शमिका रवी, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य
|
सदस्य (बिगर-सरकारी)
|
15.
|
डॉ. धर्मकीर्ती जोशी,मुख्य अर्थतज्ज्ञ , क्रिसिल
|
सदस्य (बिगर-सरकारी)
|
16.
|
नीलेश शहा, व्यवस्थापकीय संचालक , कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट
|
सदस्य (बिगर-सरकारी)
|
17.
|
इंद्रनील सेनगुप्ता, सह-प्रमुख आणि अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच
|
सदस्य (बिगर-सरकारी)
|
18.
|
उपमहासंचालक, डीपीआयआयटी (सदस्य सचिव)
|
सदस्य
|
कार्यगटाच्या संदर्भ अटी खालीलप्रमाणे असतील: -
- अर्थव्यवस्थेत झालेल्या संरचनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर आधारभूत वर्ष 2022-23 सह WPI आणि PPI ची कमोडिटी बास्केट सुचवणे.
- किंमत संकलनाच्या विद्यमान प्रणालीचा आढावा घेणे आणि सुधारणेसाठी बदल सुचवणे.
- WPI/PPI साठी वापरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या संगणकीय पद्धतीवर निर्णय घेणे.
- किंमती आणि राहणीमानाच्या आकडेवारीबाबत तांत्रिक सल्लागार समितीने मंजूर केलेल्या PPI च्या संकलनाच्या पद्धतीचे परीक्षण करणे आणि संकलन आणि सादरीकरणामध्ये आणखी सुधारणा सुचवणे आणि WPI कडून PPI कडे वळण्यासाठी एका आराखड्याची शिफारस करणे.
- लिंकिंग फॅक्टरची गणना करण्यासाठी आतापर्यंत अवलंबलेल्या पद्धतीचे परीक्षण करणे आणि आवश्यक असल्यास, लिंकिंग घटक मोजण्याच्या पद्धतीमध्ये योग्य बदल सुचवणे.
- WPI/PPI ची विश्वासार्हता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सुधारणा सुचवणे.
कार्यगटाचे अध्यक्ष आवश्यकता भासल्यास अन्य एजन्सीचे तज्ञ/प्रतिनिधी यांची निवड करू शकतात.
ही अधिसूचना जारी झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत कार्यगटाला आपला अंतिम अहवाल आर्थिक सल्लागार कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089585)
Visitor Counter : 48