इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भुवनेश्वर कुमार यांनी पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भुवनेश्वर कुमार यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. भुवनेश्वर कुमार हे उत्तर प्रदेश कॅडरचे 1995 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी आहेत.
कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (भारतीय तंत्रज्ञान संस्था) पदवीधर आणि सुवर्णपदक विजेते असलेले भुवनेश्वर कुमार यांनी केंद्रात आणि आपल्या कॅडर राज्यात अनेक महत्त्वाची पदे भूषविली.
यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासह, ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात सहसचिव पदावरही काम केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागात प्रधान सचिव म्हणून काम पाहिले. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये वित्त सचिव, एमएसएमई चे सचिव, तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आणि भूमी महसूल विभागाचे विभागीय आयुक्त पदावर काम केले. यापूर्वी त्यांनी त्यांच्या कॅडर मधील क्रीडा आणि युवक कल्याण, नियोजन आणि व्यावसायिक शिक्षण, यासह इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर प्रभारी सचिव पदावरही काम केले आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089444)
आगंतुक पटल : 111