ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची वेळेवर, योग्यप्रकारे अंमलबजावणी करून देशात दारिद्र्यमुक्त गावे करणार निर्माण : शिवराज सिंह चौहान
Posted On:
01 JAN 2025 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांची वेळेवर योग्यप्रकारे अंमलबजावणी केली गेली तर, देशात दारिद्र्यमुक्त गावे निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दारिद्र्यमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालय अशा प्रयत्नांनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आज नवी दिल्ली येथे नववर्षानिमित्त आपल्या मंत्रालयाच्या विविध कामांचा आढावा घेताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पुढील एक महिन्याच्या कामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
भविष्यात, मंत्रालयाच्या कामासाठी मासिक आधारावर लक्ष्य निश्चित करण्यात येईल. त्याचबरोबर हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. यासोबतच मनरेगा, पीएमजीएसवाय, पीएम-आवास, एनआरएलएम, डीएवाय-एनआरएलएम, एनएसएपी, दिशा आदी कामांचा आढावा घेताना मंत्री चौहान यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढील एक महिना प्रत्येकाला काम करावे लागेल.. एकदा लक्ष्य निश्चित केले की, ते साध्य करण्याचा मार्ग सुकर होतो, असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आपल्या अखत्यारितील ग्रामीण विकास मंत्रालय विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चांगले काम करत आहे. तसेच निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करणार आहोत. गावे गरिबीमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, त्यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089441)
Visitor Counter : 46