पंतप्रधान कार्यालय
2025 मध्ये आणखी मेहनत करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध - पंतप्रधान
Posted On:
31 DEC 2024 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
2024 मध्ये मिळवलेल्या यशाबाबत समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 2025 मध्ये आणखी कठोर परिश्रम करण्याचा आणि विकसित भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा आमचा दृढ निश्चय आहे.
‘MyGovIndia'च्या एक्स या समाज माध्यमावरील व्हिडिओ पोस्टला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी लिहिले:
"सामूहिक प्रयत्न आणि परिवर्तनकारक परिणाम!
2024 हे अनेक गोष्टींनी परीपूर्ण असणारे वर्ष ठरले, जे या व्हिडिओमध्ये उत्तमपणे दिसून येत आहेत. 2025 मध्ये आणखी मेहनत करण्याचा आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा आमचा दृढ निश्चय आहे."
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089037)
Visitor Counter : 27