अर्थ मंत्रालय
सीमा शुल्क ब्रोकर परवाना परीक्षा, 2025 येत्या 18 मार्च 2025 रोजी होणार
Posted On:
30 DEC 2024 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024
सीमा शुल्क ब्रोकर परवाना परीक्षा, 2025 साठी दिनांक 31ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ऑनलाईन लेखी परीक्षेसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ही परीक्षा दिनांक 18 मार्च 2025 रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठीच्या लेखी आणि तोंडी परीक्षेचे स्वरुप खाली नमूद केल्याप्रमाणे राहील:
- लेखी परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपातील संगणक आधारित परीक्षा असेल.
- हे सर्व प्रश्न द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या भाषांमध्ये विचारले जातील.
उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदीतून उत्तर देण्याचा पर्याय उपलब्ध राहील. या परीक्षेसंदर्भातले इतर तपशील खाली नमूद केले आहेत:
प्रश्नांची संख्या
|
:
|
150
|
परीक्षेचा कालावधी
|
:
|
अडीच तास (10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत)
|
गुण पद्धती
|
:
|
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी +3
|
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी -1
|
कमाल गुण
|
:
|
450
|
पात्रता गुण
|
:
|
270 (60%)
|
लेखी परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना सीमाशुल्क ब्रोकर परवाना नियम, 2018 च्या नियम 6 नुसार तोंडी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. तोंडी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील.
या परीक्षेसंदर्भात कोणताही प्रश्न तसेच अधिक माहितीसाठी कृपया (www.cbic.gov.in आणि www.nacin.gov.in) संकेतस्थळाला भेट द्या किंवा जवळच्या सीमा शुल्क आयुक्तालय / राष्ट्रीय सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ अकादमी NACIN शी संपर्क साधा, अथवा पलासमुद्रम @ Palasamudram @ e-mail ID- cblr-nacinpsm[at]gov[dot]in या ईमेलवर संपर्क साधा.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088968)
Visitor Counter : 28