संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन -2025 वेळी आयोजित शिबिरात 917 मुलींसह 2,361 राष्ट्रीय कॅडेट कोअर उमेदवार होणार सहभागी
Posted On:
30 DEC 2024 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024
राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या प्रजासत्ताक दिन (RD) -2025 शिबिराची सुरुवात, दिल्ली कँट येथील करीअप्पा परेड मैदानावर आज 30 डिसेंबर 2024 रोजी सर्व धर्मीय पूजनाने झाली. यात 917 गर्ल कॅडेट्स सहभागी होणार असून, या वर्षीच्या शिबिरात सर्वात अधिक मुली कॅडेट्स आहेत. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात देशातील सर्व 28 राज्ये आणि 08 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 2,361 कॅडेट्स सहभागी होणार आहेत.
या सहभागामध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 कॅडेट्स आणि "मिनी इंडिया" चे लहानसे जग साकार करणाऱ्या ईशान्य (उत्तर पूर्व)विभागातील (NER) 178 कॅडेट्सचा समावेश आहे. याशिवाय,युवा देवाणघेवाण कार्यक्रमाचा (YEP) एक भाग म्हणून 14 परदेशी मित्र राष्ट्रांचे (FFCs) कॅडेट्स आणि अधिकारी देखील या शिबिरात सहभागी होणार आहेत.
याप्रसंगी संबंधितांना संबोधित करताना,लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग, DGNCC यांनी एनसीसीच्या या सर्वात प्रतिष्ठित शिबिरासाठी या कॅडेट्सची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले.धर्म, भाषा, जात या सर्व अडथळ्यांना पार करून चारित्र्य, सचोटी, निस्वार्थ सेवा, लढाऊ बाणा आणि संघटना कौशल्य या सर्वोच्च गुणांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी कॅडेट्सना केले.
सहभागी कॅडेट्समध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची प्रगल्भ भावना जागृत करणे हे या प्रजासत्ताक दिन शिबिराचे मूलभूत उद्दिष्ट आहे. हा वार्षिक कार्यक्रम कॅडेट्सना प्रशिक्षण, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन, सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अमूल्य संधी प्रदान करण्याचे एक व्यासपीठ म्हणून काम करतो, ज्यामुळे एकता आणि अभिमान जागृत होतो.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088875)
Visitor Counter : 39