गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासंदर्भातील वस्तुस्थिती

Posted On: 27 DEC 2024 11:45PM by PIB Mumbai

 

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा वितरीत केली जावी अशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी केलेली विनंती आज सकाळी केंद्र सरकारला प्राप्त झाली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय गृह अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला, आणि सरकार स्मारकासाठी जागा वितरीत करेल याबाबत त्यांना सांगण्यात आले. यासाठी ट्रस्ट स्थापन करून, जागा वितरीत करावी लागणार आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात अंत्यसंस्कार आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्या जाऊ शकतात.

***

JPS/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2088545) Visitor Counter : 43


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam