अर्थ मंत्रालय
डॉ अरुणिश चावला यांनी वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला
Posted On:
26 DEC 2024 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
डॉ. अरुणिश चावला यांनी आज वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बुधवारी डॉ. चावला यांची महसूल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली.
1992 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) बिहार केडरचे अधिकारी, डॉ. चावला, यांनी यापूर्वी 1 नोव्हेंबर 2023 पासून रसायने आणि खते मंत्रालयातील फार्मास्युटिकल्स (औषधनिर्माण) विभागात सचिव म्हणून काम केले होते.
फार्मास्युटिकल्स विभागात सचिव म्हणून काम करण्यापूर्वी, डॉ. चावला यांनी पटणा येथील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून, आर्थिक व्यवहार विभागामार्फत परदेशी नियुक्ती अंतर्गत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून, आणि वॉशिंग्टन डीसी येथे भारतीय दूतावासात मंत्री (आर्थिक) म्हणून, तसेच वित्त मंत्रालयाच्या विनियोग विभागामध्ये सहसचिव म्हणूनही सेवा केली आहे.
डॉ. चावला यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली असून, डॉक्टरेटही केले आहे.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088253)
Visitor Counter : 20