सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भारतातील वेतनपट अहवाल: रोजगाराभिमुख दृष्टीकोन -ऑक्टोबर, 2024" प्रकाशित

Posted On: 26 DEC 2024 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीसाठीची  औपचारिक क्षेत्रातील रोजगाराशी संबंधित आकडेवारी जारी केली असून, ही आकडेवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजना, कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) या तीन प्रमुख योजनांतर्गत सदस्यत्व घेतलेल्या ग्राहकांच्या संख्येबाबतच्या  माहितीवर आधारित आहे.

संपूर्ण अहवाल येथे पाहता येईल: Payroll Reporting in India An Employment Perspective – October, 2024.pdf

2.1 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (ईपीएफ):

ऑक्टोबर 2024 मध्ये ईपीएफ साठी नव्याने नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या 7,50,058 इतकी असून, सप्टेंबर 2024 मध्ये ती 9,87,988 इतकी होती.

 

2.2 कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआय):

ऑक्टोबर 2024 मध्ये ईएसआय योजनेंतर्गत नवीन नोंदणी करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 12,93,076 इतकी असून, सप्टेंबर 2024 मध्ये ती 15,09,736 इतकी होती.

 

2.3 राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस):

ऑक्टोबर 2024 मध्ये एनपीएस योजनेत योगदान देणाऱ्या एकूण 64,977 नवीन सदस्यांची नोंद झाली. सप्टेंबर 2024 मध्ये ही संख्या 58,018 इतकी होती.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2088231) अभ्यागत कक्ष : 68