रेल्वे मंत्रालय
अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 101 रेल्वे अधिकाऱ्यांना 69 वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2024 आणि विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 22 विभागांना शिल्ड केली प्रदान
Posted On:
21 DEC 2024 8:20PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 101 रेल्वे अधिकाऱ्यांना 69 वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार आणि विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 22 विभागांना शिल्ड प्रदान केली.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार, रेल्वे मंडळाचे सदस्य आणि विविध रेल्वे विभाग आणि उत्पादन एककांचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार आणि शिल्ड प्रदान केल्यानंतर आयोजित मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, असामान्य कार्य आणि परिश्रमाबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या परिवर्तनात्मक प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला.
वैष्णव यांनी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी सुरक्षा, देखभाल, गुणवत्ता आणि प्रशिक्षण यामध्ये तिप्पट प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी उद्योग सहयोग, वर्धित तपासणी प्रणाली आणि अधिकारी आणि तंत्रज्ञांसाठी सुधारित प्रशिक्षण, तळागाळातील स्तरावरील अभिप्राय समाविष्ट करून देखभाल नवोपक्रमावर अत्याधिक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली.
भारतीय रेल्वे दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना ATI विशेष रेल पुरस्कार प्रदान करते. वैयक्तिक पुरस्कार, तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रेल्वे झोनला दिले जाणारे शिल्ड अशा दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
वैयक्तिक पुरस्कार हे भारतीय रेल्वेला अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-अनुकूल संस्था बनविण्याच्या दिशेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पण, कठोर परिश्रम आणि अपवादात्मक योगदानाची साक्ष देण्यासाठी आणि त्यांचे परिश्रम साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. भारतीय रेल्वेच्या सर्वांगीण कामगिरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाची दखल घेऊन विविध श्रेणींमध्ये शिल्ड हे पुरस्कार स्वरूप प्रदान केले जातात.
अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 101 रेल्वे अधिकाऱ्यांना 69 वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2024 आणि विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 22 विभागांना शिल्ड/सन्मानपत्रे केली प्रदान
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 101 रेल्वे अधिकाऱ्यांना 69 वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार आणि विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 22 विभागांना शिल्ड /सन्मानपत्रे प्रदान केली.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार, रेल्वे मंडळाचे सदस्य आणि विविध रेल्वे विभाग आणि उत्पादन एककांचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार आणि शिल्ड/ सन्मानपत्रे प्रदान केल्यानंतर आयोजित मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, असामान्य कार्य आणि परिश्रमाबद्दल सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. गेल्या दशकभरात भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या परिवर्तनात्मक प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला.
वैष्णव यांनी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी सुरक्षा, देखभाल, गुणवत्ता आणि प्रशिक्षण यामध्ये तिप्पट प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी उद्योग सहयोग, वर्धित तपासणी प्रणाली आणि अधिकारी आणि तंत्रज्ञांसाठी सुधारित प्रशिक्षण, तळागाळातील स्तरावरील अभिप्राय समाविष्ट करून देखभाल नवोपक्रमावर अत्याधिक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली.
भारतीय रेल्वे दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना ATI विशेष रेल पुरस्कार प्रदान करते. वैयक्तिक पुरस्कार, तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रेल्वे झोनला दिले जाणारे शिल्ड अशा दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
वैयक्तिक पुरस्कार हे भारतीय रेल्वेला अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-अनुकूल संस्था बनविण्याच्या दिशेने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पण, कठोर परिश्रम आणि अपवादात्मक योगदानाची साक्ष देण्यासाठी आणि त्यांचे परिश्रम साजरे करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतात. भारतीय रेल्वेच्या सर्वांगीण कामगिरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाची दखल घेऊन विविध श्रेणींमध्ये शिल्ड/सन्मानपत्रे हे पुरस्कार स्वरूप प्रदान केले जातात.
***
M.Pange/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2086924)
Visitor Counter : 23