कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि सेवा सुधारण्याच्या हेतूने सुशासन सप्ताह 2024 अंतर्गत ‘प्रशासन गांव की ओर’ ही देशव्यापी मोहीम भारतातल्या 700 जिल्ह्यांमध्ये 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार
Posted On:
21 DEC 2024 6:44PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले होते की ‘प्रशासन गांव की ओर मोहीम’ सुशासन सप्ताहाचा प्रमुख घटक ठरत असून, ही सर्वात उत्साहवर्धक बाब आहे. ‘प्रशासन गांव की ओर’ ही केवळ घोषणा नाही तर ग्रामीण लोकांपर्यंत परिणामकारक प्रशासकीय सेवा पोहोचवण्याचा बदल घडवू शकणारा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावरची ही खरी लोकशाही आहे, जिथे विकासगंगा लोकांपर्यंत गेली आहे.’ 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘प्रशासन गांव की ओर 2024’ या देशव्यापी मोहीमेच्या संयोजनात प्रशासकीय सुधारणा आणि नागरिक तक्रार निवारण विभागाची भूमिका केंद्रस्थानी आहे.
20 डिसेंबर 2024 रोजी 700 जिल्ह्यातल्या तालुका / पंचायत समिती मुख्यालयांच्या ठिकाणी ‘प्रशासन गांव की ओर’ मोहीमेतील कार्यक्रम राबविण्यासाठी 20,463 शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सरकारी सेवांसंबंधीचे 1,54,39,614 अर्ज निकाली काढण्यात आले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून https://darpgapps.nic.in/GGW24 हे पोर्टल 10 डिसेंबर 2024 पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश / जिल्हे यांच्या सहभागाविषयीचा, मोहीमेच्या दुसऱ्या दिवसाचा म्हणजेच 20.12.2024 रोजीचा तपशील पुढीलप्रमाणे -
Sl. No.
|
Specific field
|
Data received as on 20.12.2024
|
1
|
Total Logged-in Districts
|
700
|
2
|
Total number of camps held
|
20,463
|
3
|
Public Grievances Redressed
|
10,69,993
|
4
|
Applications Disposed Under Service Delivery
|
1,54,39,614
|
5
|
Good Governance Practice Reported
|
704
|
6
|
Success Story of Public Grievances
|
296
|
9
|
Vision Document District@100
|
16
|
बिहारमध्ये सरकारी सेवेसंदर्भातले 53,68,214 अर्ज निकाली काढण्यात आले, छत्तीसगडमध्ये सरकारी सेवेसंदर्भातले 35,74,549 अर्ज निकाली काढण्यात आले, आंध्र प्रदेशमध्ये सरकारी सेवेसंदर्भातले 13,03,853 अर्ज निकाली काढण्यात आले, राजस्थानमध्ये सरकारी सेवेसंदर्भातले 7,89,208 अर्ज निकाली काढण्यात आले, मध्य प्रदेशात सरकारी सेवेसंदर्भातले 6,33,355 अर्ज निकाली काढण्यात आले, गुजरातमध्ये सरकारी सेवेसंदर्भातले 5,9,022 अर्ज निकाली काढण्यात आले आणि महाराष्ट्रात सरकारी सेवेसंदर्भातले 5,77,141 अर्ज निकाली काढण्यात आले.
***
M.Pange/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2086872)
Visitor Counter : 14