पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले,मदतीची घोषणा केली
Posted On:
20 DEC 2024 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट :
राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपल्या जिवलगांना गमावलेल्यांप्रती माझ्या शोकसंवेदना.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे.मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल."
S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2086457)
अभ्यागत कक्ष : 87
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam