शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी 2025) ची 8वी आवृत्ती जानेवारी 2025 मध्ये, MyGov.in पोर्टलवर नोंदणी सुरू

Posted On: 19 DEC 2024 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा संवादात्मक कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) ची 8वी आवृत्ती जानेवारी 2025 मध्ये देशातील वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी आयोजित केली आहे.

परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक व पालकांना जगण्याचा ‘उत्सव’ साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम गेली सात वर्षे सातत्याने यशस्वी ठरत आहे.

पीपीसीची 7वी आवृत्ती टाऊन हॉल धर्तीवर भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी देशभरातून व परदेशातूनही सहभागी आले होते.

पीपीसी 2025 ची नोंदणी प्रक्रिया

पीपीसी 2025 च्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 पासून MyGov.in वर सुरुवात झाली असून 14 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी सुरु राहील.

नोंदणीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे –

इयत्ता 6वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी MyGov.in पोर्टलवर प्रश्नमंजुषा (बहुपर्यायी प्रकारे) देण्यात आली आहे.

पीपीसी 2025 दरम्यान विचारण्यासाठी प्रश्नांची निवड –

विद्यार्थी पंतप्रधानांना विचारण्यासाठी आपापल्या पसंतीचे प्रश्न नोंदणी प्रक्रियेदरम्यान देऊ शकतात. हे प्रश्न परीक्षेचा ताण, करिअर, भविष्यातील आकांक्षा किंवा एकंदर आयुष्याविषयी असू शकतात.

इयत्ता 6वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आण पालकांची निवड ऑनलाईन प्रश्नमंजुषेतील सहभागावरून निश्चित केली जाईल.

पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रश्नांची निवड करताना भारताच्या विविध प्रदेशातील आणि विविध विषयावरील प्रश्न विचारात घेतले जातील. यापूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये ज्याप्रमाणे परदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता तसा यंदाही केला जाईल.

नोंदणीसाठी लिंक - https://innovateindia1.mygov.in/

ठळक वैशिष्ट्ये –

  • या कार्यक्रमात 2024 मध्ये 2.26 कोटी व्यक्ती (2.06 कोटी विद्यार्थी, 14.93 लाख शिक्षक आणि 5.69 लाख पालक) सहभागी झाल्या होत्या.
  • पीपीसी 2025 साठी, मुख्य कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी (इयत्ता 9वी ते 12वी) आणि एक शिक्षक, तसेच कला उत्सवाचे विजेते, वीर गाथातील सहभागी, पीएम श्री शाळा,प्रेरणा अभियानातील  माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाणार आहे.

परीक्षांचा ‘उत्सव’ साजरा करताना

मुख्य कार्यक्रमाला गती देण्यासाठी 12 जानेवारी 2025 (राष्ट्रीय युवा दिवस) ते 23 जानेवारी 2025 (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती) या काळात विविध उपक्रमांचे  आयोजन केले जाणार आहे.

1.  स्वदेशी खेळ सत्रे

2.  मॅरेथॉन शर्यती

3.  मीम स्पर्धा

4.  नुक्कड नाटके

5.  विद्यार्थ्यांचे प्रशंसापर अभिप्राय व लघु चित्रफीती

6.  विद्यार्थी निवेदक व अतिथी – पीपीसीची आदर्श  सत्रे

7.  योग व ध्यानधारणा सत्रे

8.  सीबीएसई, केव्हीएस आणि एनव्हीएसचे गीत गायन

9.  फलक निर्मिती स्पर्धा

10. विशेष अतिथींसह मानसिक आरोग्य समुपदेशन/कार्यशाळा

11. प्रेरणादायी चित्रपट मालिकांचे प्रदर्शन

पीपीसी हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी प्रेरणेचे चिन्ह ठरले असून त्यातून परीक्षांकडे सकारात्मक आणि विश्वासाने पाहण्याचा संदेश पुनःपुन्हा दिला जात आहे.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2086283) Visitor Counter : 39


Read this release in: Urdu , English , Hindi , Odia