पंतप्रधान कार्यालय
मुंबईतील बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
Posted On:
18 DEC 2024 10:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबईमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर केलेली पोस्ट :
मुंबईतील बोट दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना. मी प्रार्थना करतो की या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत. या दुर्घटनेमुळे बाधितांना प्रशासनाकडून मदत केली जात आहे : पंतप्रधान @narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या बोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
***
SonalT/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085943)
Visitor Counter : 14
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam