पंतप्रधान कार्यालय
फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2024 6:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2024
फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे:
"मायोट मध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसामुळे खूप दुःख झाले.माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली, फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल. भारत फ्रान्ससोबत खंबीरपणे उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे."
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2085401)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam