गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगड मधील जगदलपूर येथे आयोजित बस्तर ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

Posted On: 15 DEC 2024 8:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा छत्तीसगड मधील जगदलपूर येथे आयोजित बस्तर ऑलिम्पिकच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

1.JPG

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, ऐतिहासिक बस्तर ऑलिम्पिक 2024 चा आज समारोप होत आहे. ते म्हणाले की, बस्तर ऑलिम्पिक केवळ येथे उपस्थित असलेल्या दीड लाख मुलांपुरते मर्यादित नाही, तर बस्तरच्या सातही जिल्ह्यांसाठी ते आशेचे प्रतीक बनले आहे. आगामी काळात बस्तर ऑलिम्पिक ही बस्तरच्या विकासाची गाथा बनेल आणि नक्षलवादाला निर्णायक लढा देईल, असे त्यांनी पुढे नमूद केले.

2.JPG

आज बस्तर बदलत आहे, परंतु 2026 मध्ये जेव्हा बस्तर ऑलिम्पिक होणार आहे, तेव्हा आम्ही निश्चितपणे असे म्हणू शकतो की आमचे बस्तर बदलले आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले. ते म्हणाले की बस्तर ऑलिम्पिकने "बदलत आहे " कडून "पूर्णपणे बदललेले" असे संक्रमण सुरू केले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की बस्तर ऑलिम्पिकची सकारात्मक उर्जा लाखो आदिवासी युवकांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखेल, त्यांना भारताच्या निर्मितीच्या प्रक्रियेशी जोडेल आणि लाखो ग्रामीण आणि आदिवासी लोकांच्या कल्याणाचे साधन बनेल.  शाह पुढे म्हणाले की बस्तर ऑलिम्पिक या प्रदेशात शांतता, सुरक्षा, विकास आणि नवीन आशांचा पाया घालेल.

3.JPG

2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा होतील तेव्हा या बस्तर स्पर्धेत उपस्थित असलेल्या मुलांपैकी एक देशासाठी पदक जिंकेल आणि संपूर्ण देशाला तेव्हा अभिमान वाटेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

4.JPG

***

S.Kane/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084662) Visitor Counter : 28