संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांच्या यशस्वी भारत दौऱ्याची सांगता : द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होणार, महत्वपूर्ण उपलब्धी साध्य करणार

Posted On: 15 DEC 2024 12:07PM by PIB Mumbai

 

नेपाळचे लष्कर प्रमुख सुप्रबल जनसेवाश्री जनरल अशोक राज सिग्देल यांचा 11 ते 14 डिसेंबर 2024 दरम्यान भारत दौरा भारतीय आणि नेपाळी सैन्यातील दीर्घकालीन संबंधांना अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण संवाद झाला. यामुळे सामरिक आणि संरक्षणात्मक हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय लष्करी सहकार्य, देवाणघेवाण आणि सहकार्याची मजबूत पायाभरणी  झाली आहे. या भेटीत जनरल अशोक राज सिग्देल यांनी भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासोबत सखोल आणि फलदायी चर्चा केली. या चर्चांमध्ये दोन्ही सैन्यांमधील सहकार्य वाढवण्यावर  आणि अधिक व्यापक करण्यावर  भर देण्यात आला. या भेटीदरम्यान विविध

महत्त्वाच्या निर्णयांवर सहमती झाली. यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध आणखी बळकट होतील.

जनरल अशोक राज सिग्देल यांच्या भेटीमुळे भारतीय आणि नेपाळी सैन्यांमधील दीर्घकालीन मैत्रीला अधिक गती मिळाली आहे. वरील विविध उपक्रम दोन्ही सैन्यांमधील दृढ संबंधांना बळकट करण्यासाठीची एकत्रित बांधिलकी दर्शवतात.

***

S.Kane/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084599) Visitor Counter : 33


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil