आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
प्रगत निदान आणि संशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी सरकारने उचललेली पावले
विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि संशोधन संस्था मिळून एकूण 163 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना मंजुरी
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2024 4:29PM by PIB Mumbai
आरोग्य संशोधन विभागाने महामारी आणि राष्ट्रीय आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी, एक केंद्रीय क्षेत्र योजना लागू केली आहे. जेणेकरून प्रगत विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांची स्थापना करून महामारी आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताची तयारी आणि प्रतिसाद भक्कम केला जाईल. यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी 324 कोटी रुपये खर्च आहे.
विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये मिळून एकूण 163 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या आहेत.यापैकी, 11 संस्थांना व्हीआरडीएलकडून प्रादेशिक दर्जा मिळाला आहे आणि सार्वजनिक आरोग्यविषयक महत्त्वाच्या उच्च-जोखीम संक्रामक रोगजनुकांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक जैवसुरक्षा स्तर 3 (BSL-3) या सुविधांनी त्या सुसज्ज आहेत. केंद्र सरकारच्या सर्व वैद्यकीय/संशोधन संस्था, सशस्त्र सेना दल वैद्यकीय महाविद्यालय (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज), लष्करी वैद्यकीय रुग्णालय आणि इतर आरोग्य संस्था, उदाहरणार्थ रेल्वे रुग्णालये आणि आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी(आयुष) रुग्णालये,या VRDL स्थापनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
पुढे उपलब्ध असलेल्या लिंकवर योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या मापदंडांची पूर्तता या संस्थांनी करणे आवश्यक आहे.
https://dhr.gov.in/schemes/establishment-network-laboratories-managing-epidemics-and-natural-calamities
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज असल्यास निधीसाठी या अर्जांवर कार्यवाही केली जाते.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2084364)
आगंतुक पटल : 60