भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय टेबल टेनिस महासंघ आणि संलग्न संस्थांविरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडून स्थगन  आदेश जारी; कोणताही आर्थिक दंड न ठोठावण्याचा निर्णय

Posted On: 13 DEC 2024 2:13PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोग (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) – सीसीआयने दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी स्पर्धा कायदा 2002 मधील कलम 27 च्या तरतुदीं अंतर्गत उपनगरी टेबल टेनिस महासंघ (टीएसटीटीए), महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस महासंघ (एमएसटीटीए), गुजरात राज्य टेबल टेनिस महासंघ (जीएसटीटीए) आणि भारतीय टेबल टेनिस महासंघ (टीटीएफआय) यांच्या विरोधात आदेश जारी केले आहेत. स्पर्धा कायद्यातील कलम 3(4) आणि 4 च्या तरतुदींचे उल्लंघन व परिणामी प्राबल्यातून गैरवर्तनाविरोधात कारवाईला नकार दिल्याबद्दल सीसीआयने हे आदेश जारी केले.

टीटी फ्रेंडली सुपर लीग असोसिएशनने कायद्याच्या कलम 19(1)(a) अंतर्गत दाखल केलेल्या माहितीमुळे हे प्रकरण उघडकीस आले. माहिती देणाऱ्याने टीटीएफआय व संलग्न संस्था स्पर्धेला मारक कारभार करीत असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये टीएसटीटीएच्या महासचिवांनी जारी केलेली व्हॉट्सॲप नोटिस आणि टीटीएफआयच्या संघटना करारातील निर्बंधात्मक तरतुदींच्या आधारे टेबल टेनिस खेळाडूंना स्पर्धांमध्ये उतरण्यापासून रोकले जात असल्याचे म्हटले आहे.

उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सीसीआयने लक्षात आणून दिले आहे की भारतातील टेबल टेनिसच्या स्पर्धा, मालिका, कार्यक्रम आदी बाजारपेठ आणि त्यामध्ये टेबल टेनिस खेळाडूंकडून दिली जाणारी सेवांसंदर्भात टीटीएफआय आणि संलग्न संस्था वर्चस्व गाजवितात. सीसीआयने असेही उघडकीस आणले आहे की टीटीएफआय व संलग्न संस्था व्हॉट्सॲप सल्ले, सार्वजनिक नोटिशी आणि उपविधीत ठराविक स्पर्धाविरोधी कलमांचा अंतर्भाव करून टेबल टेनिस स्पर्धा मालिकांचे आयोजन थांबवतात आणि खेळाडूंनाही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास मनाई करतात. या कृती स्पर्धा कायद्यातील कलम 3(4) आणि 4 मधील ठराविक तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

टीटीएफआय व संलग्न संस्थांनी चौकशीदरम्यान उपस्थित झालेल्या प्रश्नांसंदर्भात सुधारात्मक उपाययोजना हाती घेतल्याचे सीसीआयने लक्षात घेतले. या उपाययोजनांमध्ये स्पर्धेला मारक सूचना मागे घेणे, सरकारी कागदपत्रांमधून निर्बंधात्मक तरतुदी काढून टाकणे अथवा त्यांत सुधारणा करणे व खुल्या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला देणे आदींचा समावेश आहे. या सुधारणात्मक उपाययोजना लक्षात घेता सीसीआयने स्थगन आदेश स्पर्धा कायद्यातील कलम 27 अंतर्गत जारी केले. मात्र, टीटीएफआय व संलग्न संस्थांना कोणताही आर्थिक दंड लागू न करण्याचा निर्णय घेतला.

2021 च्या प्रकरण क्र. 19 मध्ये हे आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रत सीसीआयचे संकेतस्थळ www.cci.gov.in  वर उपलब्ध आहे.

***

S.Kakade/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084196) Visitor Counter : 28