जलशक्ती मंत्रालय
हमारा शौचालय-हमारा सन्मान(HSHS) अभियानाचा 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनी झाला समारोप
Posted On:
10 DEC 2024 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
"हमारा शौचालयः हमारा सम्मान" (HSHS) या 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनी सुरू करण्यात आलेल्या अभियानाचा 10 डिसेंबर रोजी समारोप झाला.याच दिवशी असलेल्या मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून स्वच्छतेला सन्मान आणि मानवाधिकारासोबत जोडून हा समारोप करण्यात आला.
जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने या तीन आठवड्याच्या अभियानामध्ये देशभरातील समुदायांना एकत्र आणून, स्वच्छतेला सन्मान आणि जबाबदारीचा विषय म्हणून प्रकाशात आणले.
या अभियानांतर्गत देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50,500 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये 38 लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याने या अभियानाने एक उल्लेखनीय टप्पा गाठला.
1.54 लाख सामुदायिक स्वच्छता संकुलांचे मूल्यमापन करण्यात आले आणि त्यांच्या कार्यप्रवणतेमध्ये सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे या केंद्रांपैकी 70 टक्के केंद्रांना हाताळण्यात आले. 3.35 लाखांहून अधिक नवीन वैयक्तिक घरगुती शौचालये (IHHL) मंजूर करण्यात आली, ज्यामुळे स्वच्छताविषयक महत्त्वाची तफावत दूर झाली.
रात्री चौपाल आणि स्वच्छता मोहिमांसह तळागाळातील लोकांना सहभागी करणाऱ्या हजारो कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यात आले. 600 पेक्षा जास्त डीडब्लूएसएम बैठकांचे आयोजन करण्यात आले.
शौचालय ही केवळ सुविधा नाही; तर ती प्रतिष्ठा,स्वच्छता आणि आरोग्याचे प्रतीक आहे.प्रत्येक व्यक्तीला #ToiletsForDignity चा अधिकार आहे हे सुनिश्चित करण्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे,कारण ती केवळ शारीरिक स्वच्छतेचेच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक आदराचे देखील प्रतिनिधित्व करते, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी या अभियानाचा शुभारंभ करताना सांगितले.
या अभियानाने भारताच्या स्वच्छता प्रवासातील विविधता आणि नवोन्मेषाचे दर्शन घडवले आणि जवळजवळ सर्वच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या उत्कंठापूर्ण सहभागासह आणि भारताच्या विविध भागांतील परिवर्तनाच्या कथा सामायिक केल्या.
जागतिक शौचालय दिवसाला मानवाधिकार दिनाशी जोडणारे अभियान
मानवी हक्क दिनी समारोप करून, एचएसएचएस मोहीमेने स्वच्छता आणि मूलभूत हक्क यांच्यातील अंतर्निहित संबंधांना अधोरेखित केले.सन्मान, सुरक्षितता आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी, विशेषत: महिला आणि उपेक्षित समुदायांच्या सन्मानासाठी, वापरयोग्य आणि स्वच्छ शौचालयांच्या उपलब्धतेचा विषय केंद्रस्थानी आहे. आज या अभियानाने त्याचा समारोप होत असताना, भावी काळात होणाऱ्या कार्याचा भक्कम पाया मागे ठेवला आहे.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082926)
Visitor Counter : 26