आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
क्षयरोग निर्मूलनासाठीच्या उपाययोजना
Posted On:
10 DEC 2024 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची (एनटीईपी ) अंमलबजावणी करण्यात आली. भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी एनटीईपी ने अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. क्षयरुग्ण आढळण्याच्या प्रमाणात 17.7 टक्के घट झाली आहे. 2015 मध्ये सरासरी एक लाख नागरिकांमध्ये 237 क्षयरुग्ण आढळत होते आता 2023 मध्ये ही संख्या 195 झाली आहे. क्षयरोगामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. 2015 मध्ये दर एक लाख लोकसंख्येपैकी 28 नागरिकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. 2023 मध्ये एक लाख लोकांमध्ये क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 22 इतकी आहे.
एनटीईपी अंतर्गत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या उपयायोजनाची माहिती पुढीलप्रमाणे -
- क्षयरुग्णांची संख्या जास्त असलेल्या प्रदेशात विशिष्ट धोरणात्मक आराखड्यानुसार राज्य आणि जिल्हा स्तरावर क्षयरोग मुक्तीचे उपाय अवलंबण्यात आले.
- क्षयरुग्णांना मोफत निदान सुविधा व औषधोपचार पुरविण्याची तरतूद
- रुग्णसंख्या जास्त असलेल्या व संसर्गाचा धोका असलेल्या नागरिकांच्या समुदायासाठी विशेष क्षयरुग्ण शोध मोहीम
- आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये क्षयरोग तपासणी व उपचार सुविधांचा समावेश
- क्षयरुग्णांची माहिती देणे व व्यवस्थापन यासाठी खाजगी क्षेत्राची प्रोत्साहनपर योजनांद्वारे मदत
- उप जिल्हा स्तरावर मॉलेक्यूलर तपासणी प्रयोगशाळांच्या उभारणीत वाढ
- क्षयरुग्णांना पोषक आहार पुरविणाऱ्या निक्षय पोषण योजनेच्या व्याप्तीमधे वाढ
- क्षयरोगाबाबतचे गैरसमज कमी करणे, जनजागृती व आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आचरणात सुधारणा यासाठी माहिती, शिक्षण व संवादात्मक उपक्रमांच्या संख्येत वाढ
- क्षयरोग निर्मूलनासाठी संसाधने व प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून अन्य संबंधित मंत्रालयांची मदत
- क्षयरुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारांची तरतूद
- निक्षय पोर्टलद्वारे क्षयरुग्णांच्या प्रकृतीचा सातत्याने मागोवा
- निक्षय मित्र उपक्रमाद्वारे क्षयरुग्णांना आणि त्याच्या कुटुंबियांना पोषक आहार, तपासणी व व्यवसाय यासंबंधी अतिरिक्त मदत पुरविणे
केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kane/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082857)
Visitor Counter : 43