ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अष्टलक्ष्मी महोत्सवात ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाकडून 'ग्राहक विक्रेता बैठक'आयोजित


ग्राहक विक्रेता बैठकीमुळे ईशान्य क्षेत्रातील विक्रेते आणि ग्राहक यांच्यात थेट व्यापारी संबंध प्रस्थापित होण्यास मदत

वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हातमाग आणि हस्तव्यवसाय, मौल्यवन खडे, दागिने आणि संबंधित उद्योग, शेती फळशेती आणि पर्यटन या चार महत्त्वाच्या क्षेत्रांना या बैठकीचा फायदा

Posted On: 09 DEC 2024 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने भरवलेल्या उत्साहपूर्ण अष्टलक्ष्मी महोत्सवात विशेषत्वाने ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी बैठक घेण्यात आली. यामुळे ईशान्येकडील राज्यांमधील विक्रेते आणि देशाच्या विविध भागांमधील ग्राहक एका मंचावर येऊ शकले. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे हा कार्यक्रम पार पडला. ईशान्य भारतातील कारागीर आणि ग्राहक यादरम्यान दीर्घकालीन व्यापारी नातेसंबंध दृढ करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.

वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हातमाग आणि हस्तव्यवसाय, मौल्यवन खडे, दागिने आणि संबंधित उद्योग, शेती फळशेती आणि पर्यटन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ईशान्य भारतातील विक्रेते आणि ग्राहक यांच्यात थेट व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यास या बैठकीने मदत झाली. या मंचामुळे ईशान्य भारताचा आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने मोठाल्या ऑर्डर्स, दीर्घकालीन व्यापारी संबंध आणि झटपट व्यापार करार यांस प्रोत्साहन मिळाले.

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय, ईशान्य हस्तोद्योग आणि हातमाग विकास महामंडळ (NEHHDC), डिजिटल व्यापारासाठी खुले नेटवर्क (ONDC) यामधील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

उद्घाटनाच्या सत्रात, NEHHDC च्या सल्लागारांनी ईशान्य प्रदेशाची जमेची बाजू आणि गुंतवणुकीसाठी तेथे उपलब्ध असणाऱ्या संधी यांवर प्रकाश टाकला. देशात इ-व्यापाराचे कार्यान्वयन करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी ओपन सोर्स स्पेसिफिकेशनवर आधारित ओपन प्रोटोकॉल मार्फत इ-व्यापार सुविधा देणारा ONDC हा,  तंत्राधारित उपक्रम आहे, असे ONDC च्या मुख्य व्यापार अधिकाऱ्यांनी सांगितले. इ-व्यापाराच्या वेगवान स्वीकृतीसाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे, इतकेच नव्हे तर, भारतात स्टार्टअप उद्योगांच्या विकासाला चालना मिळून बळकटी येणार आहे. ONDC आता NEHHDC च्या सहयोगाने ईशान्य क्षेत्रातील कारागीर/ विणकर/ विक्रेते यांना सामावून घेऊन बाजारपेठेशी त्यांचा संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने हाती घेतलेला उपक्रमांची NEHHDC च्या व्यवस्थापकीय संचालकांनी प्रशंसा केली. असा उपक्रमामुळे ईशान्य क्षेत्रात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन तर मिळेलच पण त्याखेरीज त्या प्रदेशातील स्थानिक कारागीर/ विणकर/ विक्रेते यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लागेल, असेही ते म्हणाले.

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2082295) Visitor Counter : 35