संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वायु दलाच्या पश्चिम विभागाच्या कमांडर्सची परिषद  2024

Posted On: 08 DEC 2024 9:26AM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांड (WAC) च्या दोन दिवसीय कमांडर्स परिषदेचे 6 आणि 7 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले होते. एअर चीफ मार्शल एपी सिंग, हवाई दल प्रमुख (CAS) या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. WAC चे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, एअर मार्शल पीएम सिन्हा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी  त्यांना समारंभपूर्वक मानवंदनाही (गार्ड ऑफ ऑनर)  देण्यात आली.

या परिषदेदरम्यान, हवाई दल प्रमुखांनी WAC वायु दलाच्या अधिकारी कमांडर्सशी संवाद साधला तसेच त्यांच्याशी विविध प्रकारच्या प्रदेशात युद्ध लढण्याची आणि त्यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता निर्माण होईल हे सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याच्या गरजेबाबत चर्चा केली. या वर्षी "भारतीय वायु दलाची - सशक्त, सक्षम, आत्मनिर्भर" ही मुख्य संकल्पना असल्याचे स्पष्ट करत, त्यांनी भारतीय वायु दलाला आणखी मोठ्या उपलब्धी मिळवून देण्यासाठी, सर्व कमांडर्सनी अधिक चांगले प्रशिक्षण आणि नियोजन, नव्याने दाखल झालेल्या उपकरणांचा लवकरात लवकर वापर सुरू करून, सुरक्षितता आणि सर्व स्तरावरील प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवून नेतृत्वाची जोपासना करणे या गोष्टीच्या  माध्यमातून सामूहिक तसेच वैयक्तिक क्षमतेने आणि बांधिलकी ठेवून काम करण्याची गरज व्यक्त केली.

भारतात आणि परदेशातही HADR ने केलेल्या आवाहनाला प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून मदतीला धावून गेल्याबद्दल तसेच IAF च्या 'मिशन, इंटेग्रिटी अँड एक्सलन्स' या प्रमुख मूल्यांना नेहमी अग्रस्थानी ठेवून, सदैव सज्ज असणारे भक्कम लढाऊ दल म्हणून उत्कृष्ट कामगिरी करण्याचा लौकिक कायम राखल्याबद्दल वेस्टर्न एअर कमांड(WAC) चे CAS नी आपल्या भाषणात कौतुक केले.

***

NM/M.Ganoo/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082109) Visitor Counter : 55