वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुंबईत उद्या होणाऱ्या भारत - नॉर्वे व्यवसाय गोलमेज परिषदेत पीयूष गोयल नॉर्वेच्या व्यवसाय प्रतिनिधीमंडळाशी साधणार संवाद
Posted On:
07 DEC 2024 6:59PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, उद्या रविवारी 08 डिसेंबर 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या भारत - नॉर्वे व्यवसाय गोलमेज परिषदेत नॉर्वेच्या भारतातील राजदूत मे-एलिन स्टेनर यांच्या नेतृत्वाखालील नॉर्वेजियन व्यवसाय प्रतिनिधीमंडळासोबत संवाद साधणार आहेत.
भारत - नॉर्वे कॉरिडॉरसाठी महत्त्वाचे भारतीय सदस्य आणि इतर सदस्यदेखील या बैठकीत सहभागी होतील.
चर्चेच्या केंद्रस्थानी भारत आणि ईईटीए देशांमधील मुक्त व्यापार करार (FTA) असणार आहे. या कारारामध्ये मध्ये दोन्ही राष्ट्रांसाठी व्यापाराच्या दृष्टीने प्रचंड क्षमता आहे. करारामध्ये नमूद केल्यानुसार, ईईटीए देशांकडून $100 अब्ज गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारत विशेषतः उत्सुक आहे.
यावेळी द्विपक्षीय व्यापार भागीदारीच्या सर्व पैलूंवर व्यापक चर्चा होईल ज्यामध्ये संधी, आव्हाने आणि सीमापार पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ करण्यासाठी उपाययोजना यांचा समावेश आहे.
दोन्ही पक्ष लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, कनेक्टिव्हिटी, सागरी क्षेत्र , ऊर्जा, चक्राकार अर्थव्यवस्था, अन्न आणि कृषी, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक भागीदारीमधील संधींचे मूल्यांकन करतील.
***
S.Kakade/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082048)
Visitor Counter : 30