आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्यमान भारत डिजिटल अभियान संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 06 DEC 2024 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024

प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याविषयीची इलेक्ट्रॉनिक पध्दतीने नोंद करून आरोग्यसेवेच्या परिसंस्थेत आरोग्यविषयक माहितीचे आदानप्रदान सक्षम करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. देशातील एकात्मिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा विकसित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

देशात दिनांक 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 68,97,23,403 आभा (ABHA)कार्ड्स तयार करण्यात आली आहेत, 3,49,473 आरोग्य सुविधांनी HFR अर्थात राष्ट्रीय आरोग्य सुविधा रजिस्ट्रीवर  नोंदणी केली आहे. 5,23,639 आरोग्यसेवा व्यावसायिकांनी  एचपीआर अर्थात आरोग्य सेवा व्यावसायिक रजिस्ट्रीवर नोंदणी केली आहे आणि 45,37,93,698 नागरिकांच्या आरोग्य विषयक नोंदी आभाकार्डांद्वारे जोडल्या गेल्या आहेत.

दिनांक 2 डिसेंबर 2024 पर्यंत, एकूण 1,52,544 आरोग्य सुविधा एबीडीएम सक्षम सॉफ्टवेअरशी जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये 1,31,065 सरकारी आणि 21,479 खाजगी सुविधांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मधे,आयुष्मान भारत डिजिटल मिशन(ABDM) साठी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.20 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यापैकी 92.32 कोटी रुपये वापरण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2081671) Visitor Counter : 41


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi