रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचएआयने कन्सेशनरसाठी कामगिरी मूल्यांकन रेटिंग प्रणाली केली सादर
एनएचएआय वन ॲप, 95 हून अधिक महामार्ग दोषांचे डिजिटल निरीक्षण आणि सुधारणा करणार
मूल्यमापनात 70 च्या खाली गुण असलेल्या कंत्राटदारांना नवीन प्रकल्पांसाठी अपात्र ठरवले जाणार
Posted On:
06 DEC 2024 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024
उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकाम आणि देखभालीच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने राष्ट्रीय महामार्ग विकास आणि देखभालमध्ये सहभागी कन्सेशनरच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक व्यापक रेटिंग प्रणाली सुरू केली आहे.
कन्सेशनरच्या मूल्यमापनासाठी एनएचएआयने एक विस्तृत पद्धती तयार केली आहे ज्या अंतर्गत दर सहा महिन्यांनी कन्सेशनरचे मूल्यांकन केले जाईल आणि रेटिंग एनएचएआय चे संकेतस्थळ आणि त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केले जातील.
मूल्यमापन पद्धती ही पेव्हमेंट कंडिशन इंडेक्स (PCI-पृष्ठभाग स्थिती निर्देशांक ) तसेच एनएचएआय वन ॲपवरील दोष सुधारणेच्या अनुपालनावर आधारित असेल , ज्यात 95 पेक्षा जास्त दोष डिजिटल पद्धतीने अधिसूचित केले जाऊ शकतात आणि त्याचे निरीक्षण केले जाऊ शकते आणि हा रेटिंग मूल्यांकनाचा एक भाग असेल. पीसीआयला ऐंशी टक्के गुण दिले जातील आणि एनएचएआय वन ॲपच्या अनुपालनास वीस टक्के गुण दिले जातील.
पीसीआय , 0 ते 100 पर्यंतची वैज्ञानिकमापन पद्धती आहे जी आयआरसी 82:2023 मार्गदर्शक तत्त्वांनुसार ,'उत्कृष्ट' ते 'अयशस्वी' पर्यंत पेव्हमेंट स्थिती दर्शवते.
खडबडीतपणा, खड्डे, भेगा , उखडलेले असणे, रट डेप्थ आणि पॅचवर्क या सहा कार्यात्मक मापदंडांच्या आधारे पृष्ठभाग स्थिती निर्देशांक (पीसीआय) ठरवला जाईल. नेटवर्क सर्व्हे व्हेइकल्स (एनएसव्ही) द्वारे लेझर क्रॅक मापन प्रणाली सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून निर्देशांक ठरवण्यासाठीची आकडेवारी मोजली जाईल. एका समर्पित टीमच्या देखरेखीखाली भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तैनात केलेल्या मध्यवर्ती संस्थांद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
मूल्यमापन केलेल्या ‘ कन्सेशनर रेटिंग व्हॅल्यू’ नुसार,कन्सेशनरना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले जाईल. 100 पैकी 70 पेक्षा कमी रेटिंग मिळवणारे कंत्राटदार 'नॉन-परफॉर्मर' म्हणून घोषित केले जातील, त्यामुळे मानांकनामध्ये सुधारणा होईपर्यंत ते नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे काम मिळवण्यासाठी अपात्र ठरतील.
वैयक्तिक प्रकल्प स्तर आणि कन्सेशनर स्तर अशा दोन पातळ्यांवर कन्सेशनरचे मूल्यमापन केले जाईल. एनएसव्ही सर्वेक्षणाच्या प्रत्येक फेरीसह प्रकल्प स्तरावरील रेटिंग मूल्याचा तसेच एकत्रित सवलतीच्या रेटिंग मूल्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जाईल. सुधारणेशी संबंधित डेटा देखील रेटिंग मूल्य मोजण्यासाठी वापरला जाईल.
सवलतीच्या मूल्यमापनासाठी पारदर्शक रचनात्मक चौकट तयार करून, राष्ट्रीय महामार्गांचे दर्जेदार बांधकाम आणि व्यवस्थापनामध्ये नवीन मानके आणणे आणि राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना सुरक्षित, विनाअडथळा आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे हे एनएचएआयचे उद्दिष्ट आहे.
S.Kakade/S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081652)
Visitor Counter : 40