रसायन आणि खते मंत्रालय
नॅनो युरिया प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांवर उपलब्ध करून दिले जात आहे
Posted On:
06 DEC 2024 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024
शेतकऱ्यांमध्ये नॅनो खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, खालील पावले उचलण्यात आली आहेत:
- जागरूकता शिबिरे, वेबिनार, नुक्कड नाटक, क्षेत्रीय प्रात्यक्षिके, किसान संमेलने आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रपट यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाते.
- संबंधित कंपन्यांकडून नॅनो युरिया प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांवर उपलब्ध करून दिला जात आहे.
- नॅनो युरियाचा समावेश खते विभागाने नियमितपणे जारी केलेल्या मासिक पुरवठा योजनेत करण्यात आला आहे.
- भारतीय मृदा विज्ञान संस्था, भोपाळ च्या माध्यमातून आयसीएआरने अलीकडेच “खताचा कार्यक्षम आणि संतुलित वापर (नॅनो-फर्टिलायझर्ससह)” या विषयावर राष्ट्रीय मोहीम आयोजित केली होती.
- 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत नॅनो खतांचा वापराला प्रोत्साहन देण्यात आले.
- 15,000 महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 'नमो ड्रोन दीदी' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, खत कंपन्यांद्वारे महिला बचत गटांच्या नमो ड्रोन दीदींना 1094 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले , जे ड्रोनद्वारे नॅनो खतांचा वाढीव वापर सुनिश्चित करत आहेत.
- खत कंपन्यांच्या सहकार्याने खते विभागाने सल्लामसलत आणि क्षेत्रीय स्तरावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देशाच्या सर्व 15 कृषी योग्य हवामान क्षेत्रांमध्ये नॅनो डीएपीचा अवलंब करण्यासाठी महाअभियान सुरू केले. तसेच खते विभागाने खत कंपन्यांच्या सहकार्याने देशातील 100 जिल्ह्यांमध्ये नॅनो युरिया प्लसचे क्षेत्रीय प्रात्यक्षिक आणि जनजागृती कार्यक्रमांसाठी देखील अभियान सुरू केले आहे.
खत कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅनो डीएपीच्या उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण आव्हाने नाहीत.
Annexure
|
|
(In lakh Bottles of 500ml equivalent)
S.No.
|
State/UTs
|
Sales of Nano DAP
|
1
|
Andhra Pradesh
|
10.57
|
2
|
Assam & NE
|
1.42
|
3
|
Bihar
|
5.31
|
4
|
Chhattisgarh
|
2.46
|
5
|
Gujarat
|
9.13
|
6
|
Haryana & Delhi
|
2.35
|
7
|
Himachal Pradesh
|
0.83
|
8
|
Jammu and Kashmir
|
0.73
|
9
|
Jharkhand
|
0.71
|
10
|
Karnataka
|
13.17
|
11
|
Kerala
|
0.33
|
12
|
Madhya Pradesh
|
18.75
|
13
|
Maharashtra & Goa
|
35.39
|
14
|
Odisha
|
3.58
|
15
|
Puducherry
|
0.48
|
16
|
Punjab
|
6.88
|
17
|
Rajasthan
|
12.89
|
18
|
Tamil Nadu
|
4.05
|
19
|
Telangana
|
7.08
|
20
|
Uttar Pradesh
|
31.48
|
21
|
Uttarakhand
|
1.20
|
22
|
West Bengal
|
12.45
|
Total
|
181.25
|
|
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2081636)
Visitor Counter : 57