श्रम आणि रोजगार मंत्रालय
आशिया आणि पॅसिफिक 2024 साठी ‘आयएसएसए गुड प्रॅक्टिस’ पुरस्काराने भारताचा सन्मान
Posted On:
05 DEC 2024 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2024
सौदी अरेबियातील रियाध येथील आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेच्या वतीने (आयएसएसए) अध्यक्ष डॉ. मोहम्मद अझमान यांनी आशिया आणि पॅसिफिक 2024 करिता उत्तम कार्यासाठी भारताला प्रादेशिक सामाजिक सुरक्षा मंचाच्या कार्यक्रमामध्ये पुरस्काराने सन्मानीत केले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) ‘कम्युनिकेशन चॅनेल’, ई-प्रक्रियांसाठी योग्यतेची पाच प्रमाणपत्रे मिळाली. यामध्ये न्याय वितरणामध्ये, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, व्यापक जिल्हा पोहोच कार्यक्रम (निधी आपके निकट), बहुभाषिक कॉल सेंटर आणि प्रयास उपक्रम, ‘ईपीएफओ’ च्या वतीने ईएसआयसीचे महा व्यवस्थापक अशोक कुमार सिंह यांनी पुरस्कार स्वीकारले.
पाच विविध पुरस्कार श्रेणी आणि प्रत्येक विभागाच्या कामाची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे:
- कम्युनिकेशन चॅनेल: - वेगवेगळ्या माध्यमांद्वारे भागधारकांपर्यंत पोहोचणे
- ई-प्रक्रिया: न्याय वितरणामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधीचा तपशील
- निधी आपके निकट 2.0 :- सेवांच्या शेवटच्या टप्प्यावर वितरण सुनिश्चित करणे
- बहुभाषिक कॉल सेंटर्स: - सर्वसमावेशक तक्रार निवारणासाठी प्रयत्न
- ‘प्रयास’ – निवृत्तीवेतनधारकांच्या समस्यांना प्राधान्य देणे
‘ईपीएफओ’ ला डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाण पत्र) साठी विशेष उल्लेखनीय काम म्हणून जाहीर केले गेले. यामुळे निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल माध्यमातून सुलभतेने समर्थन देण्यासाठी ईपीएफओ च्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला गेला. जीवन प्रमाणपत्र म्हणून ओळखले जाणारे, डिजिटल जीवन प्रमाणपत्र तसेच आधार-आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणालीद्वारे सक्षम निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्रे दाखल करण्याची अतिरिक्त सुविधा आहे.
या पुरस्कारामुळे बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने ‘ईपीएफओ’ ने सुधारणा आणि चांगल्या पद्धती अवलंबण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. अशा प्रकारे मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता टीम ‘ईपीएफओ’ ला त्यांच्या सदस्यांच्या सेवेसाठी अधिक चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081287)
Visitor Counter : 34